अक्षय तृतीया 2025 रोजी सुवर्ण योग -
यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सुवर्ण योग तयार होत आहे. शास्त्रांनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा रोहिणी नक्षत्र असते, तेव्हा हे संयोजन सुवर्ण योगाने जुळून येते. या वर्षी अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ५:५० वाजेपर्यंत आहे. रवियोग आणि अमृत सिद्धी योगामुळे यंदाची अक्षय तृतीया विशेष ठरली आहे.
advertisement
अक्षय तृतीयेला ४० वर्षांनंतर ग्रहांची अद्भुत युती -
पंचांगानुसार, यावेळी अक्षय तृतीयेला, ४० वर्षांनंतर, सूर्य, शुक्र आणि चंद्र या ३ ग्रहांचे एक अद्भुत संयोजन तयार होत आहे. सूर्य देव मेष राशीत, चंद्र वृषभ राशीत आणि शुक्र मीन राशीत उच्च स्थानावर असेल. तसेच शास्त्रांनुसार अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्रावर आली तर ती शुभ मानली जाते. यामध्ये दुष्टांचा नाश होतो आणि शेतकऱ्यांना फायदा होतो. भाताचे पीक चांगले येते.
अमावस्येला केलेलं दान मृतात्म्यांना शांती देतं? बारा राशीनुसार कोणी काय करावं
अक्षय तृतीया 2025 शुभ मुहूर्त -
अक्षय तृतीयेच्या दिवशी वृषभ लग्न पहाटे ४ ते ६:१९, सिंह लग्न सकाळी १०:५१ ते दुपारी १:०५, वृश्चिक लग्न संध्याकाळी ५:३४ ते ७:५१ आणि स्थिर कुंभ लग्न रात्री ११:४४ ते पहाटे १ पर्यंत आहे. या ४ शुभ मुहूर्तांमध्ये आपण कोणतेही शुभ कार्य केले तर ते खूप फलदायी ठरेल. भविष्य पुराणात असे म्हटले आहे की, जे लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करतात, त्यांची संपत्ती आणि समृद्धी वाढते.
अक्षय तृतीया २०२५ ही ६ राशींसाठी शुभ असेल -
१. मेष राशीच्या लोकांना प्रसिद्धी मिळेल.
२. वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि ते त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील.
३. सिंह राशीच्या लोकांच्या संपत्ती आणि समृद्धीत वाढ होईल.
४. तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी सर्वसिद्धी योग लाभदायी ठरेल, ज्यामुळे तुमचे काम यशस्वी होईल.
दीड महिना असंच सोसा! नंतर गुरु-शनी या राशींना तळातून वर काढणार; लक काय असतं...
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)