TRENDING:

23 तारीख धोक्याची! 'या' डेंजरस योगामुळे 4 राशींना राहावं लागणार अलर्ट, करिअर आणि हेल्थवर होणार वाईट परिणाम

Last Updated:

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींचे दूरगामी परिणाम मानवी जीवनावर होत असतात. येत्या 23 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत स्फोटक आणि अशुभ मानला जाणारा 'अंगारक योग' निर्माण होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Angarak Yog 2026 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींचे दूरगामी परिणाम मानवी जीवनावर होत असतात. येत्या 23 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत स्फोटक आणि अशुभ मानला जाणारा 'अंगारक योग' निर्माण होत आहे. जेव्हा क्रूर ग्रह मानला जाणारा मंगळ आणि मायावी ग्रह राहू एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा हा योग तयार होतो. यावेळी ही युती शनीच्या कुंभ राशीत होत असल्याने त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मंगळ हा अग्नी तत्त्वाचा आणि रागाचा कारक आहे, तर राहू हा भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक आहे. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे ज्वालामुखीसारखी स्थिती निर्माण होते. या योगाचा सर्वात मोठा फटका काही विशिष्ट राशींना बसण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

मेष

अंगारक योग हा तुमच्या राशीसाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे. मंगळ आणि राहूची युती तुमच्या कारकिर्दीत अडथळे आणू शकते. ज्यामुळे प्रमोशनमध्ये अडथळा आणि अनइच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. या काळात तुमच्या वरिष्ठांसोबत तुमचे वाद होऊ शकतात. तसेच या काळात तुमची आर्थिक परिस्थिती देखील धोक्यात येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरचे अन्न खाल्ल्याने तुमच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो.

advertisement

कन्या

कन्या राशीच्या जातकांसाठी हा योग सहाव्या भावात होत आहे. तुमच्या गुप्त शत्रूंच्या हालचाली वाढतील. नोकरीत तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कामाच्या ठिकाणी कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आणि तुमचे गुपिते सांगू नका. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी त्यांचे प्रयत्न वाढवावेत. तुमच्या आईच्या बाजूच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे. पोटाचे विकार किंवा संसर्ग होण्याची भीती आहे. बाहेरील खाणे टाळावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

advertisement

मकर

मकर राशीच्या दुसऱ्या भावात हा योग होत आहे. अंगारक योगाचा आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही लोकांना व्यवसायात नुकसान होऊ शकते. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तुमची बचत देखील काढावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल असेल, म्हणून तुम्ही या काळात कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहावे, अन्यथा तुम्हाला बदनामीचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत प्रतिकूल आहे. बोलण्यातील कठोरपणामुळे तुमचे व्यावसायिक संबंध बिघडू शकतात. पैशांची मोठी देवाणघेवाण टाळावी. डोळ्यांचे विकार किंवा दातदुखीचा त्रास होऊ शकतो. अपघाताचे योग असल्याने वाहन जपून चालवावे.

advertisement

मीन

मीन राशीच्या 12 व्या भावात हा योग तयार होत आहे. या घरात राहू आणि मंगळाची युती तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच, आर्थिक बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा आणि विश्वासू व्यक्तीच्या उपस्थितीतच मोठ्या रकमेचे व्यवहार करा. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो; योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल. विनाकारण होणारे खर्च वाढतील. कोर्ट-कचेरीच्या कामात अडकण्याची भीती आहे. परदेशाशी संबंधित कामात नुकसान सोसावे लागू शकते. निद्रानाशाचा त्रास आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळावे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
23 तारीख धोक्याची! 'या' डेंजरस योगामुळे 4 राशींना राहावं लागणार अलर्ट, करिअर आणि हेल्थवर होणार वाईट परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल