TRENDING:

गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, 69 वर्षांचा अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!

Last Updated:

स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपलं उर्वरित आयुष्य स्वच्छता अभियानासाठी समर्पित केलं. निवृत्तीनंतर त्यांनी केवळ पुणे शहरातच नव्हे, तर देशातील विविध ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहिमा राबवल्या. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी त्यांनी माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आपला परिसर, आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र प्रत्यक्ष कृती करणारे हात फारच कमी असतात. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी आहे, असं म्हणत अनेकजण या कामाकडे पाठ फिरवतात. पण समाजात आजही काही जण संत गाडगे बाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वतः झाडू हातात घेतात. पिंपरी चिंचवड येथील 69 वर्षीय यशवंत कण्हेरे हे त्यापैकीच एक. त्यांनी Bajaj Auto कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपलं उर्वरित आयुष्य स्वच्छता अभियानासाठी समर्पित केलं. निवृत्तीनंतर त्यांनी केवळ पुणे शहरातच नव्हे, तर देशातील विविध ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहिमा राबवल्या. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी त्यांनी माहिती दिली आहे.
advertisement

धुळे जिल्ह्यातून पुण्यात नोकरीनिमित्त आलेल्या यशवंत कण्हेरे यांनी पुण्यातील बजाज ऑटो कंपनीत तब्बल 26 वर्षे सेवा बजावली. निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. याच काळात त्यांची भेट आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांच्याशी झाली. तावरे यांनी त्यांना संत गाडगे बाबा यांच्या कार्यावर आधारित पुस्तके भेट दिली. ही पुस्तके वाचल्यानंतर संत गाडगे बाबांच्या स्वच्छतेच्या कार्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. त्यानंतर उर्वरित आयुष्य स्वच्छता अभियानासाठी समर्पित करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्या दिवसापासून ते ज्या ठिकाणी जातात, त्या परिसराची स्वच्छता करण्याचे काम सातत्याने करत आहेत.

advertisement

Success Story : कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात, Video

पायी नर्मदा परिक्रमा आणि आषाढी वारीतील सेवा

5 डिसेंबर 2023 ते 17 मार्च 2024 या कालावधीत यशवंत कण्हेरे यांनी तब्बल 3700 किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांनी मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत जनजागृती केली. गेल्या 11 वर्षांपासून ते आषाढी वारीमध्ये सहभागी होत असून वारीदरम्यानही स्वच्छता मोहिम राबवतात. 23 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी मोटारसायकलवरून संपूर्ण महाराष्ट्राची स्वच्छता जनजागृती परिक्रमा सुरू केली. 66 दिवसांत 36 जिल्ह्यांमध्ये 4610 किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर येथे तीन वेळा जाऊन घाट परिसराची स्वच्छता केली आहे. तसेच अयोध्येत प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी गेले असता तेथील रस्त्यांची स्वच्छता केली.

advertisement

स्वच्छता ब्रँड ॲम्बेसिडर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
सर्व पहा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी 2024 ते 2025 या कालावधीत त्यांची स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शहराला स्वच्छतेत प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा ठरला. यासाठी त्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले होते. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश देत कण्हेरे आजही स्वखर्चाने रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक तरुण प्रेरित होऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, 69 वर्षांचा अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल