advertisement

पुण्यात गुरुजीच बनले 'कॉपी मास्टर'! पर्यवेक्षकांना चहासाठी पाठवत धक्कादायक कृत्य, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Last Updated:

वर्गातील पर्यवेक्षकांना'चिरीमिरी' देऊन किंवा चहा-पाण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कॉपीचे 'पान' मांडून ठेवले होते

पुण्यात गुरुजीच बनले 'कॉपी मास्टर (AI Image)
पुण्यात गुरुजीच बनले 'कॉपी मास्टर (AI Image)
पुणे : दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पॉईंट'. ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून शिक्षण मंडळ अहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र, पुण्याच्या धायरी परिसरात चक्क 'गुरुजी'च कॉपी पुरवताना आढळल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा, या स्वार्थी हेतूने चक्क शिक्षकांनी हा प्रकार केला आहे.
धायरीतील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, वर्गातील पर्यवेक्षकांना'चिरीमिरी' देऊन किंवा चहा-पाण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कॉपीचे 'पान' मांडून ठेवले होते. सीसीटीव्ही आणि कडक नियमावली असतानाही शिक्षकांनी केंद्रप्रमुखांच्या नाकाखाली हा प्रताप केला. छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनंतर आठवड्याभरातच पुण्यात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement
बोर्डाकडून कडक कारवाईचे संकेत
या प्रकरणाची गंभीर दखल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली आहे. विभागीय अध्यक्षांनी दोषी शिक्षकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोर्डाच्या भरारी पथकांकडून वारंवार तपासणी होत असतानाही, शिक्षकांनाच नियमांचा धाक उरला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
शिक्षण व्यवस्थेला लागलेली 'वाळवी'
कॉपीमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे नुकसान होतेच, पण आता शिक्षकच यात सामील असल्याने शिक्षण व्यवस्थेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा 'कॉपी बहाद्दर' शिक्षकांना केवळ निलंबित न करता थेट बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे. तरच शिक्षण क्षेत्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची वाळवी दूर होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात गुरुजीच बनले 'कॉपी मास्टर'! पर्यवेक्षकांना चहासाठी पाठवत धक्कादायक कृत्य, शिक्षण क्षेत्रात खळबळ
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement