advertisement

IND vs SA : अभिषेक शर्माचं काय चुकतंय? वीरेंद्र सेहवागने दिला 'भोपळा' फोडण्यासाठी हातोडा! सांगितली सर्वात मोठी चूक कोणती?

Last Updated:

Virendra Sehwag On Abhishek Sharma : तिन्ही मॅचमध्ये शुन्यावर आऊट झालेल्या अभिषेक शर्माला युवराज सिंगच नाही तर आता वीरेंद्र सेहवाग देखील मदतीला धावला आहे.

Virendra Sehwag Advice to Abhishek Sharma
Virendra Sehwag Advice to Abhishek Sharma
IND vs SA Abhishek Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ज्याला तयार केलं. तोच आता आजारी पडल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे सर्वच खेळाडू मॅचविनर असल्याने संघाची कामगिरी उंचावल्याचं पहायला मिळालं. अशातच साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या मॅचआधी अभिषेक शर्माने फक्त 20 मिनिटं बॅटिंग प्रॅक्टिस केली. अशातच तिन्ही मॅचमध्ये शुन्यावर आऊट झालेल्या अभिषेक शर्माला युवराज सिंगच नाही तर आता वीरेंद्र सेहवाग देखील मदतीला धावला आहे.

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

मी पण दोन तीन वेळा शुन्यावर सलग आऊट झालो आहे. त्यामुळे कमबॅक करणं एवढं अवघड नाहीये, हे मला माहितीये. फक्त माईंटसेटचाच फरक असतो. त्यामुळे जर नेट्समध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली. चांगला सराव केला तर फक्त मॅचमध्ये तुम्हाला शॉट सिलेक्शन करायचं असतं. मला वाटतं की अभिषेक शर्माची हीच चूक होतीय, शॉट सिलेक्शनची.. असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
advertisement

शॉट सिलेक्शन चुकतंय...

आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो की, त्याने आल्यापासून पहिल्या बॉलवरून सिक्स आणि फोर मारावेत. अपेक्षाच जास्त असल्याने चूका तर होणारच. कधी कधी एक दोन ओव्हर जर तो नॉर्मली जरी खेळला तरी देखील काही फरक पडत नाही. त्याने 12 बॉलमध्ये 0 रन्स जरी केलं नाही, तो पुढच्या 12 बॉलवर तो 50 पण करू शकतो. ही त्याची ताकद आहे, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
advertisement

वीरेंद्र सेहवागचा सल्ला ऐकणार का?

दरम्यान, अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादव याच्याकडून शिकलं पाहिजे. सूर्याने जेव्हा कमबॅक केलं तेव्हा तो पहिले 15 बॉल हळू खेळत होता. त्यानतंर त्याने स्ट्राईक रेट सुधारवली. त्यामुळे याचा अनुभव अभिषेक शर्माने घेतला पाहिजे, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. आता अभिषेक शर्मा वीरेंद्र सेहवागचा सल्ला ऐकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : अभिषेक शर्माचं काय चुकतंय? वीरेंद्र सेहवागने दिला 'भोपळा' फोडण्यासाठी हातोडा! सांगितली सर्वात मोठी चूक कोणती?
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement