advertisement

Matar Kachori : मटारचे सीजन संपण्याआधी ही डिश तर बनतेच! पाहा गव्हाच्या पिठाची मटार कचोरी रेसिपी

Last Updated:

Healthy and teasty matar kachori recipe : आज आपण पाहणार आहोत, मटारची कचोरी कशी बनवायची. यामध्ये फक्त मटारचं हेल्दी नाहीत तर आपण ही कचोरी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. म्हणजेच ती आणखी हेल्दी होते.

गव्हाच्या पिठाची कचोरी
गव्हाच्या पिठाची कचोरी
मुंबई : हिवाळ्यात मटारची अवाक वाढते. तसे बाजारात ते स्वस्त मिळू लागतात. लोक वर्षभर वापरण्यासाठी मटार फ्रिज करून ठेवतात. तसेच हिवाळयात अनेक प्रकारे वापरून मटारचे आहारात समावेशही करता. आतापर्यंत तुम्ही मटारची भाजी, मटार पनीर, आलू मटार असतील. तुम्ही मटारचं लोणचंही खाल्लं असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त रेसिपी सांगत आहोत.
आज आपण पाहणार आहोत, मटारची कचोरी कशी बनवायची. यामध्ये फक्त मटारचं हेल्दी नाहीत तर आपण ही कचोरी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. म्हणजेच ती आणखी हेल्दी होते. chinus.kitchen_ या अकाऊंटवर ही रेसिपी शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया हेल्दी आणि टेस्टी मटारची कचोरी कशी बनवायची.
कचोरीच्या आवरणासाठी लागणारे साहित्य
गव्हाचे पीठ - 2 कप
advertisement
रवा - 1/2 कप
मीठ - चवीनुसार
ओवा - 1 टीस्पून
तूप - 2 टेबलस्पून
पाणी - आवश्यकतेनुसार
मटारची तयारी
वाटाणे - 2 कप
मीठ - 1 टीस्पून
पाणी - आवश्यकतेनुसार
कचोरीच्या सारणासाठी लागणारा मसाला
हिरव्या मिरच्या - 4
धणे - 1 टेबलस्पून
जिरे - 1/2 टेबलस्पून
ओवा – 1/2 टेबलस्पून
बडीशेप - 1/2 टेबलस्पून
advertisement
आले - 1 इंच
लसूण - 5 ते 7 पाकळ्या
कचोरीच्या सारणासाठी लागणारे इतर साहित्य
तेल
वाटलेला मसाला
उकळलेले वाटाणे
बेसन - 2 ते 3 टेबलस्पून
आंबटचूर पावडर - 1 टीस्पून
काळी मिरी पावडर - 1/2 टीस्पून
चाट मसाला - 1/2 टीस्पून
गरम मसाला - 1/2 टेबलस्पून
साखर - 1 टीस्पून
advertisement
मीठ - चवीनुसार
ताजी कोथिंबीर - 3 टेबलस्पून
कचोरी बनवण्याची कृती
- गव्हाचे पीठ, रवा, मैदा, ओवा आणि तूप घालून एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून कणिक तयार करून घ्या आणि झाकून ठेवा.
- त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या, त्यामध्ये मीठ आणि मटार घालून ते थोडे मऊ होईपर्यंत उकळून घ्या.
advertisement
- त्यानंतर का मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, धने, जिरे, ओवा, बडीशेप, आलं, लसूण घालून थोडं जाडसर वाटून घ्या.
- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये वाटलेला मसाला आणि उकडलेले मटार घाला. हे मॅशरने बारीक करा.
- आता यामध्ये बेसन, आमचूर पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, गरम मसाला, साखर, मीठ आणि भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर घाला.
advertisement
- कणकेचे लहान गोळे बनवून घ्या. त्यासोबतच बनवलेल्या सरणाचेही काही लहान गोळे बनवा.
- कणकेच्या गोळ्यांमध्ये सारण भरा आणि व्यवस्थित कचोरीप्रमाणे दाबून घ्या.
- आता या कच्च्या कचोऱ्या तेलामध्ये मंद आचेवर खमंग, सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Matar Kachori : मटारचे सीजन संपण्याआधी ही डिश तर बनतेच! पाहा गव्हाच्या पिठाची मटार कचोरी रेसिपी
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement