advertisement

Tips And Tricks : जुना टूथब्रश सरळ फेकू नका, 'या' स्मार्ट पद्धतीने करा वापर; अनेक कामांत होईल मदत

Last Updated:
Smart ways to use old toothbrush : आपल्या घरात बऱ्याच अशा वस्तू असतात, ज्या आपण काही काळानंतर वापरून फेकून देतो. पण त्यातल्या काही वस्तू नंतरही आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आज आपण बोलत आहोत, टूथब्रशविषयी. चला पाहूया त्याचे जबरदस्त उपयोग.
1/7
टूथब्रश अशी वस्तू आहे, जी तज्ञांच्यामते आपण प्रत्येक 6 महिन्यांनी बदलायला हवी. मात्र हा जुना टूथब्रश तुम्ही फेकून न देता, याचा अनेक प्रकारे वापर करू शकता. दागिने स्वच्छ करण्यापासून ते लॅपटॉप साफ करण्यापर्यंत. चला पाहूया जुण्या टूथब्रशचे काही उपयोग.

2/7
डिझाईन असलेल्या टाइल्समधील घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश वापरू शकता. बऱ्याचदा बारीक डिझायन्समध्ये हाताने स्वच्छता करणे शक्य नसते, तेव्हा घाण साफ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश वापरू शकता. जुन्या टूथब्रशला व्हिनेगर आणि बेकिंग सोडा लावा आणि घाण असलेल्या भागावर घासा. यामुळे घाण सहजपणे निघून जाईल.

3/7
शूजचा तळ भाग म्हणजेच खालचा भाग किंवा एक्झॉस्ट फॅन फास करण्यासाठीही तुम्ही तिथब्रश वापरू शकता. काही लोक मेहंदी केसांना व्यवस्थित लावता यावी म्हणूनच टूथब्रश वापरतात.

4/7
गॅस बर्नरची छिद्रे लहान असतात. हे साफ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश वापरू शकता. गॅस बर्नरला चिकटलेले तेल आणि मसाले काढण्यासाठी उत्तम काम करते. तुम्ही टीव्ही रिमोटमधून धूळ काढण्यासाठी जुना टूथब्रश वापरू शकता.

5/7
दागिने स्वच्छ करण्यासाठीही टूथब्रश वापरला जातो. दागिने खोलवर स्वच्छ करण्यासाठी साबणाचे पाणी घ्या आणि ब्रश त्यात बुडवून त्याने दागिने स्वच्छ करा. ब्रश सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या लहान भेगांमधील घाण सहजपणे साफ करतो. यासाठी मऊ ब्रिस्टल्स असलेला टूथब्रश वापरणे चांगले. यामुळे दागिन्यांवर ओरखडे पडत नाहीत.

6/7
खिडक्यांच्या कडांवर अडकलेली धूळ आणि घाण साफ करणे हे एक मोठे आव्हान असते. मात्र जुन्या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही ते अगदी सहज करू शकता. कोरड्या ब्रशने खिडकीच्या कडा घासल्याने हट्टी डाग निघून जातील. तुम्ही थोडे लिक्विड डिटर्जंट वापरले तर आणखी चांगले परिणाम मिळतील. खिडक्यांच्या कडांवर अडकलेली धूळ आणि घाण साफ करणे हे एक मोठे आव्हान असते. मात्र जुन्या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही ते अगदी सहज करू शकता. कोरड्या ब्रशने खिडकीच्या कडा घासल्याने हट्टी डाग निघून जातील. तुम्ही थोडे लिक्विड डिटर्जंट वापरले तर आणखी चांगले परिणाम मिळतील.
खिडक्यांच्या कडांवर अडकलेली धूळ आणि घाण साफ करणे हे एक मोठे आव्हान असते. मात्र जुन्या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही ते अगदी सहज करू शकता. कोरड्या ब्रशने खिडकीच्या कडा घासल्याने हट्टी डाग निघून जातील. तुम्ही थोडे लिक्विड डिटर्जंट वापरले तर आणखी चांगले परिणाम मिळतील.
advertisement
7/7
तुम्ही जुन्या टूथब्रशने लॅपटॉपचा कीबोर्ड सहजपणे स्वच्छ करू शकता. ब्रश बटणांमध्ये साचलेली धूळ आणि घाण काढून टाकण्यासाठी चांगले काम करते. जर तुम्ही ब्रशला थोडे आयसोप्रोपाइल अल्कोहोल लावले आणि याने बटणं काळजीपूर्वक घासली तर कीबोर्ड नव्यासारखा चमकेल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement