advertisement

Beed Crime : 'कृष्णा आंधळे तीन वेळा गावी आला...', धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा! सुनावणीनंतर काय काय म्हणाले?

Last Updated:

Santosh Deshmukh Murder Case : कृष्णा आंधळे तीन वेळा त्याच्या गावाला आला होता. त्यावेळी तो आपल्या कुटूंबियांना भेटला, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Dhananjay Deshmukh On Krishna Andhale
Dhananjay Deshmukh On Krishna Andhale
Dhananjay Deshmukh On Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आता 26 तारखेला सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलांकडून वारंवार उशीर केला जात असल्याचा आरोप देखील आता देशमुख कुटूंबियांकडून केला जात आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा त्यांच्या घरी तीन वेळा आला होता. त्यांच्या घरी कोणाला भेटला, याची तपासणी करण्यास यंत्रणा यांना सांगितलं आहे. तर देशमुख कुटुंबाला आरोपीच्या टोळीकडून धोका असल्याचा दावा देखील केला जात आहे. अशातच आजच्या सुनावणीनंतर धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले धनंजय देशमुख?

मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप रिपेअरिंगला दिलेला होता, तो पूर्णपणे रिक्वहर होऊन आलेला आहे. एक फाईल टेकनिकल इश्यूमुळे ओपन होत नव्हती. त्यासाठी त्यांनी ओपन करण्याची मागणी होती. येत्या सहा तारखेला सर्व साक्षीदारांची लिस्ट देण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून उशीर करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. आता चार्ज दाखल झाला आहे. लवकरच साक्षीदारांची लिस्ट दिल्यानंतर केस निकाली लागावी, अशी आमची मागणी आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले.
advertisement

कृष्णा आंधळे तीन वेळा गावाला आला

कृष्णा आंधळे तीन वेळा त्याच्या गावाला आला होता. त्यावेळी तो आपल्या कुटूंबियांना भेटला, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्राची पूर्तता करा, अशा सुचना कोर्टाच्या सरकारी पक्षाला दिल्या आहेत. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बदलण्यात यावे, या केलेल्या अर्जावर आज सरकारी पक्षाकडून म्हणणे लेखी म्हणणे सादर केले जाणार आहे. तर विष्णू चाटे यांच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची शक्यता आहे.
advertisement

सरकारी पक्षाकडून एवढी घाई का?

आरोपी जयराम चाटेकडून वकील बदलला आहे. नवीन वकील एम के वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोर्टाकडून प्रतीक घुलेला विचारणा वकील लावायचा आहे का? असा सवाल केला गेला. त्यानंतर आता प्रतीक घुलेकडून उत्तर दहा पंधरा दिवसात घरचे लोक वकील बघत आहेत. सरकारी पक्षाकडून एवढी घाई का केली जात आहे. सरकारी पक्षाला दोषारोप पत्र एकदाच पूर्ण दाखल करायला सांगा. आरोपी वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे यांची मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : 'कृष्णा आंधळे तीन वेळा गावी आला...', धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा! सुनावणीनंतर काय काय म्हणाले?
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement