advertisement

Alzheimer : विषारी हवेमुळे वाढतोय अल्झायमरचा धोका..अमेरिकेच्या संशोधनातून समोर आली मोठी माहिती, तब्बल अठरा वर्ष दोन कोटी नागरिकांवर सुरु होतं संशोधन

Last Updated:

नवीन संशोधनानुसार, खराब हवा श्वासात आल्यानं अल्झायमर या गंभीर आजाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील संशोधकांनी या विषयावर संशोधन केलं. हे संशोधन अमेरिकेतील अंदाजे 2.5 कोटी नागरिकांच्या डेटावर आधारित होतं. त्याचे धक्कादायक निकाल प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल PLOS मेडिसिनमधे प्रकाशित झाले आहेत.

News18
News18
मुंबई : वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. शारीरिक, मानसिक थकवा येणं, तब्येतीच्या अनेक तक्रारीही सुरु होतात.
वृद्धापकाळात स्मरणशक्ती कमी होणं म्हणजेच अल्झायमर ही एक सामान्य समस्या आहे. यावर जगभरात संशोधन सुरु आहे. पण अलीकडच्या एका अभ्यासात यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आपल्या सभोवतालची प्रदूषित हवा आणि मेंदूचं आरोग्य.
नवीन संशोधनानुसार, खराब हवा श्वासात आल्यानं अल्झायमर या गंभीर आजाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील संशोधकांनी या विषयावर संशोधन केलं. हे संशोधन अमेरिकेतील अंदाजे 2.5 कोटी नागरिकांच्या डेटावर आधारित होतं. त्याचे धक्कादायक निकाल प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल PLOS मेडिसिनमधे प्रकाशित झाले आहेत.
advertisement
या अभ्यासासाठी, 2000 ते 2018 पर्यंत 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. या अभ्यासातून स्पष्टपणे दिसून येतं की, हवेतील धोकादायक प्रदूषक, ज्यांना पीएम 2.5 म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे अल्झायमरचा धोका वाढतो. प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानं मेंदूच्या आरोग्यावर सर्वात मोठा आणि थेट परिणाम होतो.
advertisement
या प्रदूषणामुळे अल्झायमरशी संबंधित आजार उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि नैराश्याचा धोका देखील वाढतो. प्रदूषणामुळे अल्झायमरचा धोका या आजारांमुळे वाढत नाही तर मेंदूवर थेट परिणाम होतो असं संशोधकांनी स्पष्ट केलंय. हवेतील विषारीपणा सर्वांसाठी हानिकारक असला तरी, काहींसाठी तो आणखी धोकादायक असू शकतो
advertisement
हवेतला विषारी कण कोणासाठी जास्त घातक -
स्ट्रोकचे रुग्ण: ज्यांना पूर्वी स्ट्रोक झाला आहे ते विशेषतः वायू प्रदूषणाला बळी पडतात.
उच्च रक्तदाबाचे रुग्ण: उच्च रक्तदाबासारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेले लोक देखील या विषारी हवेला विशेषतः संवेदनशील असतात.
डिमेंशियासारख्या गंभीर आजारांना रोखण्यासाठी हवेची गुणवत्ता सुधारणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं एमोरी विद्यापीठाच्या संशोधन पथकानं निष्कर्ष मांडताना म्हटलंय. भविष्यातील धोक्यांपासून आपल्या मेंदूचं संरक्षण करण्यासाठी स्वच्छ हवा किती महत्त्वाची आहे हे या संशोधनातून स्पष्ट झालंय.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Alzheimer : विषारी हवेमुळे वाढतोय अल्झायमरचा धोका..अमेरिकेच्या संशोधनातून समोर आली मोठी माहिती, तब्बल अठरा वर्ष दोन कोटी नागरिकांवर सुरु होतं संशोधन
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement