advertisement

नाशिक-मुंबई प्रवास फक्त 120 मिनिटांत! ना गाडी बदलण्याची कटकट ना खड्ड्यातून जाण्याचं टेन्शन, प्रवासाचा सुपर प्लॅन

Last Updated:

गिरीश महाजन यांनी नाशिक-मुंबई एसी लोकल आणि ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा प्लॅन जाहीर केला, प्रवास फक्त 120 मिनिटांत, उद्योग आणि शेतीमालाला गती मिळणार.

News18
News18
नाशिककरांसाठी अत्यंत आनंदाची आणि आनंदाची बातमी आहे. आता तुमचा प्रवासासाठीचा वेळ वाया जाणार नाही. तुम्ही तुमचं काम एका दिवसात करुन पुन्हा घरी येऊ शकता. अवघ्या 120 मिनिटांत तुम्ही नाशिक ते मुंबई प्रवास करू शकता. मुंबई आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे आता कनेक्टिव्हिटीच्या नव्या उंचीवर नेण्याचा सरकारचा मानस आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या भविष्यातील विकासाचा संपूर्ण रोडमॅपच मांडला.
नाशिक-मुंबई एसी लोकलचा मार्ग मोकळा?
नाशिक मुंबई प्रवास दोन तासांवर आणणार आणि नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार," तसा प्लॅन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची प्रलंबित असलेली मुंबई लोकलची मागणी आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. सध्या इगतपुरी आणि कसाऱ्यापर्यंत लोकल सेवा उपलब्ध आहे.
गिरीश महाजन यांनी सांगितले की, "साधी लोकल नाशिकपर्यंत चालवण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र एसी (AC) लोकल चालवण्यात अशा कोणत्याही अडचणी येतील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही नाशिक-मुंबई एसी लोकल सेवा सुरू करण्यासाठी आग्रही आहोत आणि त्या प्लॅनवर वेगाने काम सुरू आहे." ही सेवा सुरू झाल्यास हजारो नोकरदार आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि गतीमान होणार आहे.
advertisement
नाशिक विमानतळ आता 'इंटरनॅशनल' होणार
केवळ रस्ते किंवा रेल्वेच नाही, तर नाशिकची हवाई सेवाही आता कात टाकणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. विमानतळावरील धावपट्टीची लांबी वाढवण्यात आली आहे, जेणेकरून मोठी विमाने इथे उतरू शकतील. नाशिकमधील शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादने परदेशात पाठवण्यासाठी 'कार्गो' सेवेवर विशेष भर दिला जात आहे.
advertisement
कनेक्टिव्हिटीवर सरकारचा भर
आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करणे ही शहरासाठी मोठी पर्वणी ठरेल. मुंबई आणि नाशिक ही दोन्ही शहरे औद्योगिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेली आहेत. या दोन्ही शहरांमधील प्रवास दोन तासांत पूर्ण व्हावा, यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.
समृद्धी महामार्ग आणि रेल्वेच्या नव्या सुधारणांमुळे हे उद्दिष्ट लवकरच गाठता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीमुळे नाशिकच्या रिअल इस्टेटपासून ते उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रांना मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. एसी लोकल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन प्रकल्प नाशिकचे भाग्य बदलणारे ठरतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिक-मुंबई प्रवास फक्त 120 मिनिटांत! ना गाडी बदलण्याची कटकट ना खड्ड्यातून जाण्याचं टेन्शन, प्रवासाचा सुपर प्लॅन
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement