कारमध्ये 1 तास AC चालवल्यावर किती खर्च होतं इंधन? लगेच घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Car Tips and Tricks: कारचं एयर कंडीशनर थेट इंजिनशी संबंधीत एक बेल्टच्या माध्यमातून चालतो. जेव्हा तुम्ही AC ऑन करता. तेव्हा इंजिनवर एक्स्ट्रा लोड पडतो. ज्यामुळे फ्यूल जास्त लागते.
Car Tips and Tricks: उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता या उन्हाळ्याच्या मौसमात कार चालवताना एसीची तीव्र गरज जाणवेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ज्यावेळी तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकता किंवा पार्किंगमध्ये गाडी उभी करुन एसी चालवतात, तेव्हा 1 तास तुमची गाडी किती पेट्रोल खर्च करते. तुम्हाला याचा अंदाजा नसेल तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
स्थिर वाहन आणि चालत्या वाहनातील फरक : वाहन चालू असताना, एसी चालवल्याने मायलेजवर अंदाजे 5% ते 15% पर्यंत परिणाम होतो. मात्र, जेव्हा वाहन स्थिर असते तेव्हा परिस्थिती वेगळी असते. जेव्हा इंजिन स्थिर असते तेव्हा ते फक्त एसी कॉम्प्रेसर आणि अल्टरनेटरला वीज पुरवण्यासाठी काम करते, त्यामुळे तासाला वापर जास्त असतो. जर तुम्ही जास्त ट्रॅफिकमध्ये अडकला असाल, तर सध्याच्या पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतींनुसार, एक तास एसी वापरासाठी तुम्हाला ₹60 ते ₹110 पर्यंत खर्च येऊ शकतो.
advertisement
AC प्रकार आणि टेक्नॉलॉजीचा परिणाम : आधुनिक हाय-टेक कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि व्हेरिएबल कंप्रेसर सारख्या टेक्नॉलॉजीचा समावेश असतो. केबिन तापमान सेट झाल्यानंतर या सिस्टीम कंप्रेसरवरील भार कमी करतात, ज्यामुळे इंधनाचा वापर किंचित कमी होतो. शिवाय, जुन्या मॅन्युअल एसी सिस्टीम कंप्रेसर पूर्ण क्षमतेने चालू ठेवतात, ज्यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो. शिवाय, तुमची कार उन्हात पार्क केली असेल, तर इंजिनला सुरुवातीला केबिन थंड करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल, परिणामी इंधनाचा वापर जास्त होईल.
advertisement
मायलेज कमी होण्याची इतर कारणे : तुम्हाला वाटत असेल की, एसी चालवल्यावर मायलेज खुप जास्त कमी होते. त्यामागे केवळ एसी हे एकमेव कारण असु शकत नाही. एसी फिल्टर खराब होणे किंवा एसी गॅस कमी होणे कंप्रेसरवर एक्स्ट्रा लोड टाकते. ज्यामुळे इंजिन जास्त तेल पिते. या व्यतिरिक्त टायर प्रेशर कमी होणे किंवा इंजिन ऑइलची खराब क्वालिटीही एसीसोबत मिळून मायलेजला 20-25% पर्यंत खाली आणू शकते.






