Skin Care : आयुर्वेदात सांगितलेल्या टिप्सनी होईल चेहरा फ्रेश, प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार बनवता येतो फेसपॅक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
वात, पित्त आणि कफ. जेव्हा हे तिन्ही दोष संतुलित असतात, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर खरी चमक येते. यासाठी योगगुरु डॉ. हंसाजी यांनी यासंदर्भात काही टिप्स दिल्यात.
मुंबई : आपल्या आहारानुसार आपली प्रकृती अवलंबून असते. आपली त्वचा आपल्या दोषांवर अवलंबून असं आयुर्वेदात म्हटलंय. वात, पित्त आणि कफ. जेव्हा हे तिन्ही दोष संतुलित असतात, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर खरी चमक येते. यासाठी योगगुरु डॉ. हंसाजी यांनी यासंदर्भात काही टिप्स दिल्यात.
वात दोष - पहिला म्हणजे वात दोष. त्वचा अनेकदा कोरडी, ताणलेली किंवा सहजपणे भेगा पडल्यासारखं वाटत असेल, तर ही लक्षणं वात दोषाची आहेत. त्वचेचं संतुलन व्यवस्थित राहावं यासाठी त्वचेचं खोलवर पोषण आणि मॉइश्चरायझेशन करणं आवश्यक आहे. डॉ. हंसाजी यांनी यासाठी आयुर्वेदिक फेस मास्क सुचवला आहे.
advertisement
एक टेबलस्पून मध, एक टीस्पून बदाम तेल आणि काही कुस्करलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. चांगलं मिसळा आणि सुमारे पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावा. मधामुळे ओलावा टिकून राहतो, बदामाच्या तेलानं खोलवर पोषण होतं आणि गुलाबाच्या पाकळ्यांमुळे त्वचेला आराम मिळतो. याव्यतिरिक्त, आहारात अवोकाडोचा समावेश नक्की करा. त्यात हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेट करतात.
advertisement
पित्त दोष - दुसरा म्हणजे पित्त दोष. काहींची त्वचा खूप संवेदनशील असते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर चेहरा लाल होतो किंवा चेहऱ्यावर जळजळ होत असेल. तर हे पित्त दोषाचं लक्षण आहे. यावर मात करण्यासाठी, आपल्याला थंडावा देणारी उत्पादनं वापरणं आवश्यक आहे.
फेस मास्क बनवण्यासाठी, दोन चमचे काकडीचा रस, एक चमचा कोरफड गर आणि पुदिन्याची काही कुस्करून घ्यावी लागतील. हा कूलिंग पॅक वीस मिनिटं लावा. काकडी आणि कोरफडीमुळे जळजळ कमी होईल, आणि पुदिन्यामुळे त्वचा फ्रेश राहिल. याव्यतिरिक्त, उन्हाळ्यात भरपूर टरबूजखा. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
advertisement
कफ दोष - त्वचा तेलकट असेल, छिद्र मोठे असतील किंवा वारंवार फुटत असेल तर तुम्हाला कफ दोष आहे. या प्रकारची त्वचा जास्त तेल निर्माण करते आणि ते कमी करण्यासाठी एक फेस मास्क तयार करता येईल.
advertisement
यासाठी, एक चिमूटभर हळद, एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा कडुलिंबाची पेस्ट बनवता येईल. पेस्ट लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. मुलतानी माती जास्तीचं तेल शोषून घेईल. हळदीमुळे मुरुमं कमी होतील आणि कडुनिंबामुळे त्वचा स्वच्छ होईल. याव्यतिरिक्त, गोड पदार्थ मर्यादित ठेवा आणि हंगामी बेरी खा. त्यातील अँटीऑक्सिडंट्स तेलकट त्वचेसाठी वरदान आहेत.
advertisement
आयुर्वेद हा सर्वांसाठी एकच सूत्र नाही. तो एक वैयक्तिकृत आणि समग्र जीवनशैली आहे ज्यामध्ये स्वतःला खोलवर समजून घेणे आणि तुमच्या निसर्गाशी सुसंगत राहणे समाविष्ट आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेची तुमच्या दोषांनुसार काळजी घेता आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग्य फळे आणि भाज्यांचा समावेश करता तेव्हा आतून संतुलन निर्माण होते आणि जेव्हा आत संतुलन असते तेव्हा त्याचा परिणाम आपोआप नैसर्गिक सौंदर्य आणि चमकाच्या स्वरूपात बाहेर दिसून येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : आयुर्वेदात सांगितलेल्या टिप्सनी होईल चेहरा फ्रेश, प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार बनवता येतो फेसपॅक










