advertisement

Nashik: मानेत खुपसलेला चाकू अन् पिझाचा तुकडा, जंगलात आढळली मुलीची अर्धनग्न डेडबॉडी, नाशिक हादरलं

Last Updated:

नाशिकच्या वाडीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

(प्रतिकात्मक फोटो AI)
(प्रतिकात्मक फोटो AI)
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सारुळच्या जंगल परिसरात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्धनग्न अवस्थेत असलेल्या या तरुणीच्या मानेत चाकू तसाच खुपसलेला आहे. एवढंच नाहीतर मृतदेहाजवळ एक पिझाचा तुकडा आढळला आहे. याा घटनेमुळे नाशिक शहर हादरलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या सारुळच्या जंगल परिसरात दुपारच्या सुमारास एका अज्ञात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला. जंगलातून जात असताना स्थानिकांना या मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृत मुलीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
advertisement
मुलीच्या मानेत चाकू अन् जवळ सापडला पिझ्झा
नाशिक शहरापासून २० ते २५ किलोमीटर दूर आणि  मुंबई-नाशिक महामार्गाजवळ असलेल्या सारुळचं जंगल आहे. या जंगलाच्या परिसरात ही मुलगी इथं कशी, कुणासोबत आणि का आली हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. या मुलीच्या चाकू हा अडकलेला होता. तर शरिरावरील कपडेही काढलेले होते. तसंच मुलीच्या मृतदेहाजवळ एक पिझ्झाचा तुकडा आढळून आला आहे. त्यामुळे या मुलीसोबत घटनास्थळावर कुणी तरी सोबत होतं, या मुलीला इथं कुणी आणि का आणलं, या मोठा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
advertisement
मुलीची ओळख पटवण्याचं काम सुरू
दरम्यान,  नाशिकच्या वाडीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मुलीची ओळख पटवण्याचं कााम सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर हत्येचं कारण समोर येईल, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: मानेत खुपसलेला चाकू अन् पिझाचा तुकडा, जंगलात आढळली मुलीची अर्धनग्न डेडबॉडी, नाशिक हादरलं
Next Article
advertisement
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा;  36 नव्हे आता 3 तासांत कारवाई, सरकारच्या नोटिफिकेशनने देशभरात चर्चा
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा; 36 नव्हे आता 3 तासांत कारवाई
  • आजपासून नवे नियम लागू

  • सरकारचा मोठा निर्णय

  • नियम पाळले नाहीत तर होणार थेट कारवाई

View All
advertisement