प्यू रिसर्च रिपोर्टनुसार, युरोपमध्ये मुस्लिमांची संख्या गेल्या काही दशकांपासून सतत वाढत आहे. 1990 मध्ये ती 29.6 दशलक्ष होती, जी 2010 मध्ये 44.1 दशलक्ष झाली. 2030 पर्यंत ही संख्या 58 दशलक्ष ओलांडेल असा अंदाज आहे. सध्या, युरोपच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 6 टक्के मुस्लिम आहेत, 1990 मध्ये 4.1 टक्के होती. गेल्या काही वर्षांत, युद्धामुळे इतर मुस्लिम देशांतील लोक आश्रय घेण्यासाठी युरोपीय देशांमध्ये आले आहेत, ज्यामुळे स्थानिक लोकसंख्येत वाढ झाली आहे.
advertisement
इस्लामिक संस्कृती - लोकसंख्याशास्त्रीय बदलामुळे सांस्कृतिक संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थलांतर आणि इस्लामिक संस्कृतीबद्दल अनेक युरोपीय देशांत सतत वादविवाद सुरू आहेत. पण 2043 पर्यंत युरोप पूर्णपणे इस्लामिक राष्ट्रात रूपांतरित होईल असे म्हणणे हे पाहण्यासारखे असेल. युरोपमध्ये एकूण 44 देश आहेत, त्यापैकी अल्बेनिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, कोसोवो आणि तुर्की हे आधीच मुस्लिम बहुल देश आहेत. त्याशिवाय असे 40 देश आहेत जिथे ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. यामध्ये रशिया, जर्मनी, यूके, फ्रान्स, इटली, स्पेन, युक्रेन, पोलंड आणि स्वीडन यांचा समावेश आहे.
चैत्र नवरात्र सुरू असल्यानं खरेदी करू नये या वस्तू; घरावर अमंगळ, कामात अडचणी
बाबा वेंगा कोण होते -
बाबा वेंगा (1911-1996) या एक बल्गेरियन भविष्यवेत्त्या होत्या, ज्यांना "बाल्कन नोस्ट्राडेमस" म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी अनेक घटनांचे भाकीत केले, त्यापैकी काही खरे ठरले, तर अनेक अप्रमाणित राहिले. बाबा वेंगांनी असेही भाकीत केले आहे की जग 5079 मध्ये संपूर्ण संपेल आणि त्यापूर्वी मानव अमरत्वाकडे वाटचाल करू शकेल.
