कर्क - मानसिक अस्वस्थता आणि भ्रम
कर्क राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन मानसिक ताण वाढवणारे ठरू शकते. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला निर्णय घेताना गोंधळ जाणवेल. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. जवळच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संवाद साधताना गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा.
advertisement
कन्या - कामात अडथळे आणि आरोग्य
कन्या राशीचा स्वामी बुध असला तरी, तो राहूच्या नक्षत्रात जात असल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. विनाकारण प्रवास करावा लागल्याने शारीरिक थकवा जाणवेल. नवीन गुंतवणुकीसाठी 10 मार्चनंतरचा काळ टाळलेलाच बरा.
मीन - आर्थिक नुकसान आणि वाद
मीन राशीत आधीच अनेक ग्रहांची हालचाल सुरू आहे. बुधाचे हे गोचर तुमच्या खर्चात अचानक वाढ करू शकते. व्यापार करणाऱ्यांनी मोठी 'डीलिंग' करताना सर्व कागदपत्रे नीट तपासावीत. जोडीदाराशी असलेल्या मतभेदामुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा सट्टेबाजीपासून या काळात दूर राहणेच हिताचे ठरेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
