TRENDING:

Women's Day 2026: लहानपणापासून आयुष्यात अंधार, संकटावर मात करून रिना पाटील बनल्या बँकवाल्याताई!

Last Updated:

दृष्टिहीन असतानाही त्यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: डोळ्यांना दृष्टी नसली तरी मनाने जग पाहण्याची ताकद असली की आयुष्य आनंदाने जगता येते, हे रीना पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दृष्टिहीन असतानाही त्यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला आहे. रीना पाटील सध्या Bank of Baroda मध्ये नोकरी करत आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या या प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. महिला दिनानिमित्त त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
advertisement

रीना पाटील या जन्मत: दृष्टिहीन असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले असून मागील 11 वर्षांपासून त्या बँक ऑफ बडोदा या बँकेत नोकरी करत आहेत. बँकेत नोकरी करताना सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र इतरांप्रमाणे काम करता यावे यासाठी त्यांनी विविध आधुनिक टेक्नॉलॉजी शिकून घेतल्या.

advertisement

अंधांना समजतील अडथळे, विद्यार्थ्यांने बनवली स्मार्ट स्टिक अन् खास गॉगल

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. नोकरीसोबतच त्या सामाजिक कामातही सक्रिय असतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे असे अनेक सामाजिक कामे त्या करतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहानपणापासून आयुष्यात अंधार, संकटावर मात करून रिना पाटील बनल्या बँकवाल्याताई!
सर्व पहा

स्त्रियांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. त्यामुळे प्रत्येक महिलेनं स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी महिलांनी घराबाहेर पडून काम करणं गरजेचं आहे, असे रीना पाटील यांनी सांगितले. रीना या दृष्टिहीन असूनही त्यावर मात करत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका आणि कुवेतसारख्या देशांनाही भेट दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Women's Day 2026: लहानपणापासून आयुष्यात अंधार, संकटावर मात करून रिना पाटील बनल्या बँकवाल्याताई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल