पराभवानंतर 'सोशल मीडिया क्वीन'चं कमबॅक! शिरूरच्या सरपंच मॅडमचा भावाच्या लग्नातील शाही थाट पाहिलात का?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लोकप्रिय चेहरा आणि सोशल मीडियाचे मोठे पाठबळ असूनही त्यांची जादू मतपेटीत चालली नाही. या पराभवानंतर काही काळ त्या सोशल मीडियावरून गायब होत्या.
advertisement
advertisement
निर्मला नवले यांनी आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट राजकारणात उडी घेतली होती. कारेगावच्या सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आणि तेव्हापासूनच त्या चर्चेत आल्या. इन्स्टाग्रामवर त्यांचे ५ लाख ७५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचा पेहराव, राहणीमान, महागड्या कार यामुळे त्यांची मोठी क्रेझ निर्माण झाली होती.
advertisement
advertisement
advertisement
बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर निर्मला नवले यांनी आपल्या भावाच्या, तुषार आणि स्नेहल यांच्या साखरपुडा सोहळ्याचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. "नगरसेवक तुषार आणि स्नेहल यांचा साखरपुडा सोहळा अतिशय आनंदात पार पडला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आणि प्रेमळ सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते," अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
advertisement
या शाही सोहळ्यात निर्मला नवले यांचा लूक आणि त्यांचा शाही थाट पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या साखरपुडा सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. पराभवाच्या धक्क्यातून सावरून आता निर्मला नवले पुन्हा एकदा सार्वजनिक आयुष्यात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.








