अंधांना समजतील अडथळे, विद्यार्थ्यांने बनवली स्मार्ट स्टिक अन् खास गॉगल
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दोन विद्यार्थ्यांनी दृष्टीहीन व्यक्तींसाठी गॉगल आणि एक स्टिक तयार केली आहे. ही जी गॉगल आणि स्टिक आहे ती नॉर्मल गॉगल आणि स्टिक सारखी नाही आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील जागृती हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या मयूर गुंजाळ आणि आशिष गिरे या दोन विद्यार्थ्यांनी दृष्टीहीन व्यक्तींसाठी गॉगल आणि एक स्टिक तयार केली आहे. ही जी गॉगल आणि स्टिक आहे ती नॉर्मल गॉगल आणि स्टिक सारखी नाही आहे. गॉगल आणि स्टिकमध्ये त्यांनी सेन्सर बसवलेला आहे जेणेकरून त्यांच्या जवळ कोणी आलं किंवा रस्ता क्रॉस करताना गाडी आली तर लगेच हे सेन्सर त्यांना सूचना देईल आणि त्यातून बजर वाजेल. जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी सोप्या जातील.
मयूर गुंजाळ या विद्यार्थ्याने सांगितले आहे की शाळेतून घरी जात असताना त्याला रस्त्यावरती एक अंध व्यक्ती दिसली. त्यांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणी येत होत्या, तर मयूर याने त्यांना रस्ता ओलांडून दिला आणि त्याच्यानंतर त्याला संकल्पना सुचली की आपण यांच्यासाठी काहीतरी करावं. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर त्यांनी त्याचा मित्र आशिषला सांगितलं की आपण अशा पद्धतीने एक काम करूयात.
advertisement
त्यानंतर त्यांनी त्यांची कल्पना त्यांच्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या शिक्षिकेला सांगितली. त्यानंतर त्यांनी हे जे गॅजेट आहे ते तयार केले आहे. हे बनवण्यासाठी त्यांना साधारण 300 रुपयांपर्यंत खर्च देखील आलेला आहे. तीन आयआर सेन्सर, एक स्विच, एक बॅटरी, चार्जिंग मॉड्यूल, घरातील टाकून दिलेला गॉगल यात वापरला आहे. हा प्रयोग करण्यासाठी आठ दिवस लागले.
advertisement
आम्ही हे जे गॉगल आणि स्टिक तयार केलेली आहे, ते आम्ही एकदम कॉम्पॅक्ट साईजमध्ये देखील सेन्सर तयार करू शकतो जेणेकरून कुठल्याही चष्म्यावर किंवा आपण वापरू शकतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. याचा भविष्यामध्ये याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल, असं देखील आम्हाला वाटत आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 3:44 PM IST





