कारच्या काचा ओपन करुन गाडी चालवल्याने का कमी होतं मायलेज? सत्य जाणून व्हाल हैराण
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Car Mileage: उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक लोक हे एयर कंडीशनर चालवण्याऐवजी कारच्या खिडक्या ओपन करुन प्रवास करतात. मात्र असं करणं महागात पडू शकतं. कसं ते पाहूया...
Car Mileage Tips: या उन्हाळ्याच्या वातावरणार प्रवास करणं सर्वात कठीण काम असतं. कारण प्रचंड उन्हामुळे खुप उकडतं अशावेळी प्रवास नकोसा वाटतो. अनेक लोक कारने प्रवास करताना एअर कंडीशनर चालू न करता कारच्या खिडक्या ओपन करुन प्रवास करतात.त्यांना वाटते की, उष्णतेपासून बचावासाठी एयर कंडीशनर चालवली तर गाडी जास्त इंधन घेईल ज्यामुळे मायलेज कमी होईल. पण असा विचार करणे चुकीचे आहे. कारण खिडकी ओपन ठेवल्याने इंधन जास्त लागतं.
advertisement
गाडी चालवताना खिडक्या उघडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. विशेषतः उन्हाळ्यात, लोक ताजी हवा मिळण्यासाठी त्यांच्या कारच्या खिडक्या उघडतात. पण तुम्हाला माहित आहे का की असे केल्याने तुमच्या कारचे मायलेज कमी होऊ शकते? अनेकांना वाटते की एसी चालवल्याने मायलेज कमी होईल, म्हणून थंडावा मिळावा म्हणून खिडक्या उघडणे चांगले. पण सत्य हे आहे की, खिडक्या ओपन करुन गाडी चालवल्याने मायलेज कमी होते. यामागे अनेक साइंटिफिक कारणं आहेत.
advertisement
एयरोडायनामिक ड्रॅग : ज्यावेळी आपण कार चालवतो. तेव्हा हवा कारच्या विरोधात वाहत असते. कारच्या बॉडीला हवेच्या माध्यमातून पास होण्यासाठी एनर्जी खर्च करावी लागते. या गोष्टीला एयरोडायनामिक ड्रॅग म्हटले जाते. ज्यावेळी तुम्ही खिडक्या ओपन करता, तेव्हा कारच्या आत हवेचा दबाव कमी होतो. ज्यामुळे बाहेरची हवा कारच्या आत घुसू लागते. ही हवा कारच्या एयरोडायनामिक आकाराला बिघडवते. ज्यामुळे ड्रॅग वाढते आणि मायलेज कमी होते.
advertisement
advertisement
एअर कंडिशनिंगचा (एसी) परिणाम : तुम्ही उष्ण हवामानात खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवत असाल, तर तुम्ही कदाचित एअर कंडिशनिंग वापरणार नाही. एअर कंडिशनिंगमुळे कारच्या इंजिनवरही ताण पडतो, परंतु खिडक्या उघड्या ठेवण्यापेक्षा त्यामुळे त्यावर कमी ताण पडतो. याचा अर्थ असा की जर तुम्हाला मायलेज सुधारायचा असेल, तर तुम्ही एअर कंडिशनिंग वापरावे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात.
advertisement
advertisement
तुम्ही काय करावे? : तुम्हाला मायलेज वाचवायचे असेल, तर गाडी चालवताना खिडक्या बंद ठेवणे चांगले. तुम्हाला ताजी, थंड हवा हवी असेल, तर तुम्ही एअर कंडिशनिंग वापरू शकता. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की खिडक्या उघडण्याचा मायलेजवर होणारा परिणाम कारच्या मॉडेल, वेग आणि ड्रायव्हिंग सवयींवर अवलंबून बदलू शकतो.









