advertisement

Nashik Rang Panchami: रंगपंचमी साजरी करताय, सावधान! घडेल तुरुंगवारी; नाशिक पोलिसांचा शॉकिंग डिसीजन

Last Updated:

नाशिक पोलि‍सांनी शहरामध्ये सणाला गालबोट लावणाऱ्यांना आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

News18
News18
नाशिक: महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत उद्या रंगपंचमी साजरी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातही मोठ्या जल्लोषामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिक म्हटल्यावर आपसूकच आपल्या नजरेसमोर येते ती रहाड. नाशिक शहरातील काही भागांमध्ये रहाड खेळली जाते. आता नाशिक पोलि‍सांनी शहरामध्ये सणाला गालबोट लावणाऱ्यांना आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तरूणांनो नियमांचे जर पालन केले नाहीत तर, थेट तुमची कोठडीत रवानगी होणार हे नक्की.
नाशिक पोलि‍सांनी आनंदाने रंग खेळण्यासाठी सांगितले असून कुठेही नियमांचे पालन केले गेले नाही किंवा मर्यादा ओलांडल्यास पोलि‍सांकडून कारवाई केली जाणार आहे. शहरामध्ये अनेक चौकाचौकांमध्ये डीजे लावला जातो. त्यावेळी आवाजाला कोणतीही मर्यादा नसते. जर मोठ्या प्रमाणावर आवाजाची पातळी असेल तर नाशिक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. या सर्वांवर नाशिक पोलि‍सांचा वचक राहणार आहे. त्यामुळे यंदाची रंगपंचमी 'गुलाल'सोबत नाही तर, 'खाकी'च्या कडक पहाऱ्यात साजरी होणार आहे. शिवाय, सणावेळी पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेवरही भर दिला जाणार आहे.
advertisement
रहाडच्या वेळी पोलि‍सांकडून विशेष सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी महिलांसोबत गैरप्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. छेडछाड करणाऱ्या आणि महिलांसोबत गैरवर्तवणुक करणाऱ्या टवाळखोरांची यावेळी काही गय नसणार आहे. संपूर्ण नाशकामध्ये रहाडच्यावेळी सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. आयोजकांना त्यांच्या इव्हेंटच्या ठिकाणी कॅमेरे बसवणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये रहाड आणि शॉवर डान्ससाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ असणार आहे. या काळामध्ये नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
advertisement
ज्या ठिकाणी रहाडचे आयोजन केले जाणार आहे, तिकडे गैरवर्तवणुक करणार्‍यांवर 'ऑन द स्पॉट' कारवाई केली जाणार आहे. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या वेळी नाशिक पोलीस, स्वयंसेवक, दामिनी पथक यांचं गस्त असेल. रहाड आणि शॉवर डान्सच्या भोवती प्रत्येक मंडळाने लाकडी बॅरिकेटिंग लावणे बंधन कारक असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Rang Panchami: रंगपंचमी साजरी करताय, सावधान! घडेल तुरुंगवारी; नाशिक पोलिसांचा शॉकिंग डिसीजन
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement