छत्रपती संभाजी नगरच्या पैठणमधील श्री संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील नाथांचा पवित्र रांजण भरल्याची परंपरा भक्तीभावाच्या वातावरणात पार पडली आहे. पौराणीक परंपरेनुसार श्रीकृष्णाने या श्रीखंड्याच्या रुपात या रांजणमध्ये १२ वर्ष पाणी भरलं होतं. त्या परंपरेची एक आठवण म्हणून ही धार्मिक प्रथा जपली जाते. आज सकाळी हा रांजण भरण्यात आले आणि पुजन करण्यात आले. त्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.



