आजही अनेकांच्या दारात-अंगणात कावळा आला, ओरडायला लागला तर आज पाहुणे येणार, असे म्हटले जाते. पितृपक्षात किंवा अमावस्येच्या दिवशी कावळ्याचे आगमन अशुभ मानले जात नाही. कावळा हा पूर्वजांचा दूत मानला जातो. मान्यतेनुसार, कावळा हा नश्वर जगाला म्हणजेच पृथ्वी आणि यमलोक यांना जोडणारा माध्यम आहे. तो पूर्वजांचा संदेश पृथ्वीवर घेऊन जातो आणि पूर्वजांना पृथ्वीचा संदेश देतो.
advertisement
ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक कावळ्याची वाट पाहतात, कारण या दिवशी पूर्वजांसाठी छतावर नैवेद्य ठेवला जातो. कावळ्यानं नैवेद्य शिवला तर ते अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते, असे मानले जाते. गरूड पुराणात असे सांगितले आहे की, जर गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना अन्न दिले तर ते पूर्वजांपर्यंत पोहोचते. यामुळे पितरांना आनंद होतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो.
कावळा येणं कधी शुभ मानतात -
१. सकाळी घरी कावळ्याचे आगमन शुभ मानले जाते. सकाळी कावळा दारात येऊन ओरडत असेल तर याचा अर्थ असा की, तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे किंवा पाहुणे येणार आहेत.
२. कावळा छतावर किंवा बाल्कनीवर येऊन बसला असेल तर याचा अर्थ तुमचे पूर्वज आनंदी आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे. त्यामुळे अडकलेलं एखादं मोठं काम पूर्ण होऊ शकते.
३. कावळा तुमच्या घराच्या छतावर ठेवलेले अन्न खात असेल तर याचा अर्थ पूर्वज आनंदी-समाधानी आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तुमचे घर सुख, शांती, संपत्ती आणि धान्याने भरून जाईल.
कमाईचा काळ सुरू! सलग 70 दिवस या राशींचा इनकम वाढणार; बुधामुळे भाग्योदयाचे योग
कावळ्याकडून अशुभ संकेत -
१. घराच्या छतावर कावळा मेला असेल तर ते अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा की तुम्हाला काही दुःखद किंवा अशुभ बातमी मिळणार आहे.
२. कावळा तुमच्या घराच्या दारावर, खिडकीवर किंवा अंगणात येऊन वारंवार ओरडत असेल तर ते वाद, तणाव आणि नकारात्मकतेचे लक्षण मानले जाते.
३. कावळा रडणे किंवा घराबाहेर सतत फिरणे हे देखील अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज अतृप्त आहेत. पूर्वजांना समाधानी करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, दान, तर्पण इत्यादी करा. त्यामुळे पितृदोषापासून सुटका होऊ शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
घराचं ब्रह्मस्थान कुठं असतं? तेवढीच जागा रिकामी सोडल्यानं इतके फायदे मिळतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
