TRENDING:

Numerology: होळी पौर्णिमेला 3 मूलांकाना सरप्राईज; नशीब कोणाला देणार दगा? दैनिक अंकज्योतिष

Last Updated:

Numerology: सोमवारी होळी पौर्णिमा असून हा दिवस काही जुन्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणि प्रगतीच्या नव्या वाटा दाखवणारा आहे. मूलांक 1, 2, 4 आणि 6 साठी कामाच्या ठिकाणी आणि आर्थिक बाबतीत दिवस खूपच भारी आहे. सरकारी कामं मार्गी लागतील आणि अचानक धनलाभाचे योगही येतील. मूलांक 2 च्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचा फायदा होईल, तर मूलांक 4 च्या लोकांनी शत्रूंना हुशारीने हाताळावं. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सोमवारचे दैनिक अंकशास्त्र सविस्तर जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

लकी नंबर: 2, लकी कलर: गुलाबी

मूलांक 2 - तुमचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा आज तुमच्या खूप कामाला येईल. आज तुम्ही एकदम निवांत आणि आनंदी मूडमध्ये असाल. जर गाडी घेण्याचा विचार असेल, तर आजचा मुहूर्त चांगला आहे. ऑफिसमध्ये दिवस मस्त जाईल. तुमच्या जोडीदाराच्या नवीन कामाला पाठिंबा द्या, त्यामुळे तुमचं त्यांच्या नजरेतलं वजन वाढेल.

advertisement

लकी नंबर: 15, लकी कलर: रोजी ब्राऊन

मूलांक 3 - आज तुम्हाला थोडा मोठेपणाची भावना जाणवेल, पण ती मर्यादा ओळखून ठेवा. अचानक उद्भवलेल्या मतभेदांमुळे तुम्ही थोडे विचारात पडाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आज थोडा थकवा जाणवेल. दिवस चांगला जावा असं वाटत असेल, तर कामात थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. जोडीदाराला जेव्हा तुमची जास्त गरज असेल, तेव्हा त्यांच्या सोबत राहा, नातं अधिक घट्ट होईल.

advertisement

लकी नंबर: 6, लकी कलर: क्रीम

मूलांक 4 - तुमच्या यशाचा मार्ग सुरू राहावा असं वाटत असेल, तर कमाईतला काही भाग दान करा. आज बाहेर हॉटेलिंग करण्याचा प्लॅन होईल. तुमचे स्पर्धक आज सक्रिय असतील, पण तुम्ही त्यांना तुमच्या हुशारीने आणि गोड बोलण्याने शांत कराल. सध्या तुमच्या डोक्यात फक्त पैसा कमावणं आणि करिअरमध्ये पुढे जाणं हेच विचार असतील. तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रत्येक बाबतीत मानसिक आधार देईल.

advertisement

लकी नंबर: 9, लकी कलर: केशर

मूलांक 5 - दुरावलेला एखादा मित्र आज खूप मनधरणी केल्यानंतर पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. तुमचं बोलणं आणि चिकाटी यामुळे आज तुम्ही अनेक अडथळे पार कराल. मौल्यवान वस्तूंची नीट काळजी घ्या, काहीतरी हरवण्याची शक्यता आहे. सध्या शेअर मार्केटपासून लांब राहिलेलंच बरं. तुम्ही जे काही नवीन कराल, त्यात तुमचा जोडीदार तुम्हाला खंबीर साथ देईल.

advertisement

लकी नंबर: 4, लकी कलर: रॉयल ब्लू

मूलांक 6 - सरकारी कामात आज वेग येईल आणि अडकलेली कामं पूर्ण होतील. आज तुम्हाला चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची ओढ वाटेल. कोणाशीही वाद घालू नका, ते तुमच्या अंगलट येऊ शकतं. एखाद्या अनपेक्षित मार्गाने आज पैसा हातात येऊ शकतो. जोडीदारासोबत आजचा वेळ खूप मजेत आणि सुखात जाईल.

लकी नंबर: 6, लकी कलर: गोल्डन ब्राऊन

बापरे यांच्या नादाला कुठं लागता? या 4 बर्थडेट असणाऱ्या मुलींशी वाद घालणं म्हणजे

मूलांक 7 - हरवलेली एखादी जुनी वस्तू आज अचानक सापडेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज बाहेर खाण्यापिण्याचा बेत ठरेल. रात्री झोप नीट न लागल्यामुळे किंवा वाईट स्वप्नांमुळे थोडा अस्वस्थपणा जाणवेल. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. जोडीदारासोबत उगाच इगो किंवा वर्चस्व गाजवू नका, तरच घरात शांतता राहील.

लकी नंबर: 18, लकी कलर: मॅजेंटा

मूलांक 8 - आज एखादा जुना वाद किंवा कायदेशीर कटकट डोकं वर काढू शकते, त्यामुळे उगाच कोणाच्या फंदात पडू नका. जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची चांगली संधी आज मिळू शकते. व्यवसायात स्पर्धकांशी थोडी चढाओढ होईल, पण विजय तुमचाच होईल. जोडीदारासोबत छोटी चकमक होईल, पण ती जास्त ताणून धरू नका, गोष्टी आपोआप निवळतील.

लकी नंबर: 9, लकी कलर: जांभळा

मेष वृषभ मिथुन कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ! होळीपासून सुरू होणार आठवडा कसा?

मूलांक 9 - ऑफिसमध्ये मोठ्या पदावर असलेल्या लोकांनकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. पण तरीही मनात कुठेतरी एक अस्वस्थता किंवा असमाधानाची भावना राहील. रिअल इस्टेटमधून मिळणारा फायदा आज थोडा कमी असू शकतो. व्यवसायातील परदेशी संबंध आज महत्त्वाचे ठरतील. तुमच्या आयुष्यातील एखादी खास व्यक्ती आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोकणातील सर्वात मोठा शिमगा,रायगडमध्ये पेटते 50 फुटांची भव्य होळी,काय आहे परंपरा?
सर्व पहा

लकी नंबर: 7, लकी कलर: बेबी पिंक

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: होळी पौर्णिमेला 3 मूलांकाना सरप्राईज; नशीब कोणाला देणार दगा? दैनिक अंकज्योतिष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल