Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ! होळीच्या पोळ्या खाऊन सुरू होणारा आठवडा कसा?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: मार्च महिना सुरू होत असून यातील पहिल्या आठवड्याची सुरुवात होळीने होत आहे. हुताशनी पौर्णिमा काही राशींसाठी नशीब चमकवणारी ठरू शकते. मार्चचा पहिला आठवडा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींसाठी कसा असेल सविस्तर जाणून घेऊ.
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात सावधगिरी बाळगा हाच मंत्र आहे. कोणतीही गोष्ट घाईने करू नका आणि रस्ता ओलांडताना किंवा गाडी चालवताना पूर्ण लक्ष द्या. नोकरीत पहिल्या दोन-तीन दिवसात कामात अजिबात हलगर्जीपणा करू नका, नाहीतर वरिष्ठांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात असलेल्या लोकांपासून सावध राहा.
advertisement
मेष - आठवड्याच्या सुरुवातीला तब्येत आणि नात्यांच्या बाबतीत वेळ थोडी कठीण वाटेल, त्यामुळे लोकांशी बोलताना नम्र राहा. पण आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी शोधणाऱ्यांना आशेचा किरण दिसेल. प्रयत्नांना यश मिळेल, त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी करा. प्रेमसंबंधांसाठी वेळ चांगली असून जोडीदाराशी ताळमेळ सुधारेल.लकी कलर: हिरवा, लकी नंबर: 1
advertisement
advertisement
वृषभ - ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि जवळचे मित्र तुम्हाला पूर्ण साथ देतील. आर्थिक प्रगतीचे योग आहेत; जुन्या गुंतवणुकीतून आठवड्याच्या शेवटी मोठा फायदा होऊ शकतो. व्यापारासाठी हा काळ नफ्याचा आहे आणि एखादी मोठी डील फायनल होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील.लकी कलर: पिवळा, लकी नंबर: 10
advertisement
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच शुभ आणि यश देणारा ठरेल. तुमच्या अपेक्षांच्या आधी तुमची कामं पूर्ण झाल्याचं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कामाच्या निमित्ताने एखादा लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो सुखाचा आणि फायद्याचा असेल. प्रवासात काही प्रभावशाली लोकांशी ओळखी होतील. कमी साधनांमध्येही तुम्ही मोठं यश मिळवून दाखवाल. भागीदारीत काम करणाऱ्यांना या महिन्यात चांगले पैसे मिळतील.
advertisement
advertisement
कर्क - कर्क राशीसाठी आठवड्याची सुरुवात जेमतेम असेल, पण दुसरा भाग खूप चांगला जाईल. त्यामुळे महत्त्वाची कामं 15 मार्चनंतर किंवा आठवड्याच्या शेवटीच प्लॅन करा. सुरुवातीला करिअर, कुटुंब किंवा व्यवसायाशी संबंधित कटकटी जाणवतील. जमिनीच्या किंवा घराच्या व्यवहारासाठी धावपळ करावी लागेल. नोकरीत कामं पूर्ण करण्यासाठी जास्त घाम गाळावा लागेल. तुमच्या हट्टीपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतरांशी जुळवून घ्या. मुलांच्या बाबतीत एखादी चिंता सतावेल. पण उत्तरार्धात आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. नात्यात गैरसमज होऊ देऊ नका, एकमेकांच्या भावनांचा आदर करा.लकी कलर: पिवळा, लकी नंबर: 9







