advertisement

Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! पतीच्या 'त्या' घाणेरड्या सवयीनं क्षणात उद्ध्वस्त केला 8 वर्षाचा संसार, कंटाळलेल्या पुजानं आयुष्यच संपवलं

Last Updated:

पूजा आणि तिरुपती हे मूळचे कर्नाटकचे असून ८ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र, संसाराची काही वर्षे उलटल्यानंतर तिरुपतीला दारूचे व्यसन लागले

पुण्यात विवाहितेची आत्महत्या
पुण्यात विवाहितेची आत्महत्या
(अभिजीत पोते, प्रतिनिधी) पुणे : पुण्यातील वारजे परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पूजा कुऱ्हाडे (वय २८) या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
तिरुपती हुलगप्पा कुऱ्हाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पूजा आणि तिरुपती हे मूळचे कर्नाटकचे असून ८ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र, संसाराची काही वर्षे उलटल्यानंतर तिरुपतीला दारूचे व्यसन लागले आणि तिथूनच पूजाच्या छळाला सुरुवात झाली.
दारूसाठी पैशांची मागणी आणि मारहाण
आरोपी पतीला कामापेक्षा दारूचे व्यसन जास्त होते. तो वारंवार पूजाकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत असे. पैसे न दिल्यास तिला अमानुष मारहाण केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी तिरुपतीने पूजाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली होती. या सततच्या त्रासामुळे पूजा पूर्णपणे खचून गेली होती. अखेर या जाचातून सुटका मिळवण्यासाठी तिने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
advertisement
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वारजे पोलिसांनी तिरुपती कुऱ्हाडे याला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ८ वर्षांच्या संसाराचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! पतीच्या 'त्या' घाणेरड्या सवयीनं क्षणात उद्ध्वस्त केला 8 वर्षाचा संसार, कंटाळलेल्या पुजानं आयुष्यच संपवलं
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement