Gem Astrology: खडे-रत्नांच्या अंगठ्या बोटात घालणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? कमावलेलं सगळं मातीत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gem Astrology: कित्येक लोकांचा खडे-रत्नाच्या अंगठ्या घालण्यावर विश्वास असतो. विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट रत्न लाभदायी ठरतात, असे मानले जाते. रत्नशास्त्रामध्ये नीलम हे सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली रत्न मानले जाते. न्यायदेवता शनिदेवाचे प्रतिनिधित्व करणारे हे रत्न जर कोणाला मानवले, तर त्या व्यक्तीला ते राजाचा रंक करू शकते. मात्र, या रत्नाची शक्ती जेवढी अफाट आहे, तेवढेच याचे नियमही कडक आहेत. नीलम धारण केल्यानंतर केलेली एक छोटीशी चूकही उलट परिणाम देऊ शकते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात नीलम वापरताना काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
शनिचे रत्न नीलम कसे धारण करावे?शनीची साडेसाती, अडीचकी किंवा शनीच्या महादशेचा त्रास कमी करण्यासाठी नीलम वापरला जातो. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे असल्यामुळे हे रत्न घातल्यानंतर तुमचे आचरण शुद्ध असणे खूप गरजेचे आहे. अनुभवी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कधीही नीलम घालू नका, कारण ते प्रत्येकालाच सूट होते असे नाही.
advertisement
हे रत्न हाताच्या मधल्या बोटात (मध्यमा) घातले जाते, कारण हे बोट शनि पर्वताचे स्थान मानले जाते. नीलम घालण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वात शुभ असतो. शनिवारी ब्राह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही हे रत्न धारण करू शकता. अंगठी घालण्यापूर्वी ती कच्चे दूध आणि गंगाजलाने शुद्ध करून घ्या. धारण करताना 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करणे फायदेशीर ठरते.
advertisement
नीलम घातल्यानंतर या चुका टाळा -अनेकजण नीलम घातल्यानंतर काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे रत्नाचा प्रभाव नकारात्मक होतो. काही लोक अंघोळ करताना, झोपताना किंवा व्यायाम करताना अंगठी काढून ठेवतात. नीलमच्या बाबतीत असे कधीही करू नका. रत्न वारंवार शरीरापासून वेगळे केल्यामुळे त्याचा ग्रहांशी असलेला ऊर्जा संबंध तुटतो आणि आयुष्यात अचानक अडचणी येऊ शकतात.
advertisement
शनिदेव हे शिस्तीचे देव आहेत, त्यामुळे नीलम घालणाऱ्या व्यक्तीने दारू, मांस किंवा कोणत्याही नशिल्या पदार्थांपासून लांब राहावे. तसे न केल्यास शनीच्या कोपाला सामोरे जावे लागू शकते. आपली अंगठी कधीही मित्र किंवा नातेवाईकाला बघण्यासाठी किंवा घालून पाहण्यासाठी देऊ नका. तसेच नीलमसोबत माणिक (सूर्य), मोती (चंद्र) आणि मुगा (मंगळ) ही रत्ने कधीही घालू नका. हे शनीचे शत्रू ग्रह आहेत, त्यामुळे त्यांचा ताळमेळ बसला नाही तर आयुष्यात मोठी उलथापालथ होऊ शकते.
advertisement
कोणी घालावा नीलम?ज्योतिषशास्त्रानुसार, नीलम मुख्यत्वे मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय नशीबवान ठरतो, कारण या दोन्ही राशींचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. याशिवाय, ज्यांच्या कुंडलीत शनी केंद्र किंवा त्रिकोण भावात शुभ स्थितीत आहे, ते लोक सुद्धा तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे रत्न वापरू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






