advertisement

Ranji Trophy Final : जम्मू काश्मीरने इतिहास रचला! 67 वर्षात पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी

Last Updated:

Jammu Kashmir Win Ranji Trophy : कर्नाटकची पहिली इनिंग केवळ 293 रन्सवर आटोपली, ज्यामुळे जम्मू-काश्मीरला पहिल्या इनिंगमध्ये 291 रन्सची मोठी आघाडी मिळाली होती.

Jammu Kashmir First time Win Ranji Trophy 2025-26
Jammu Kashmir First time Win Ranji Trophy 2025-26
Jammu Kashmir Win Ranji Trophy : दिग्गजांनी भरलेली कर्नाटकची टीम आणि पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीची फायनल खेळत असलेली टीम जम्मू काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफीची फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात जम्मू काश्मीरने इतिहास रचला असून 67 वर्षात पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमया गाजवली आहे. पहिल्या इनिंगच्या जोरावर जम्मू काश्मीरला हा विजय मिळवता आला आहे.
रणजी ट्रॉफीच्या मैदानात जम्मू-काश्मीरने पहिल्या इनिंगमध्ये दमदार बॅटिंग करत 584 रन्सचा डोंगरासारखा स्कोअर उभा केला. या इनिंगमध्ये शुभम पंडीरने 121 रन्सची शानदार सेंच्युरी झळकावली, तर यावर हसनने 88 रन्सचे योगदान दिले. कॅप्टन पारस डोगरा आणि कन्हैया वाधवन यांनी प्रत्येकी 70 रन्स काढले, तर साहिल लोत्राच्या 72 रन्सच्या खेळीमुळे टीम अतिशय मजबूत स्थितीत पोहोचली.
advertisement
कर्नाटकची बॅटिंग लाईनअप कागदावर खूप मजबूत दिसत असली, तरी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीने आपल्या धारदार बॉलिंगने त्यांना धूळ चारली. केएल राहुल, मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल आणि करुण नायर यांसारखे दिग्गज भारतीय टेस्ट खेळाडू या मॅचमध्ये सपशेल अपयशी ठरले. जम्मू-काश्मीरच्या बॉलर्सनी कर्नाटकच्या बॅटर्सना खेळपट्टीवर स्थिरावण्याची एकही संधी दिली नाही.
कर्नाटकची पहिली इनिंग केवळ 293 रन्सवर आटोपली, ज्यामुळे जम्मू-काश्मीरला पहिल्या इनिंगमध्ये 291 रन्सची मोठी आघाडी मिळाली. नियमांनुसार जम्मू-काश्मीरकडे फॉलोऑन देण्याचा पर्याय उपलब्ध होता, मात्र त्यांनी तो न स्वीकारता पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील जम्मू-काश्मीरच्या बॅटर्सनी आपला फॉर्म कायम ठेवला असून चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 4 विकेट्स गमावून 186 रन्स केले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy Final : जम्मू काश्मीरने इतिहास रचला! 67 वर्षात पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement