advertisement

Israel Iran News: युद्ध पेटलं, इस्त्रायलचा इराणवर शक्तीशाली हल्ला, जगाला धडकी भरवणारा VIDEO

Last Updated:

Israel Iran war: इस्रायलने अचानक इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शनिवारी सकाळी इस्रायलने इराणवर "प्रीएम्प्टिव स्ट्राइक" हल्ला केल्याचा दावा केला.

News18
News18
Israel Iran War VIDEO: अलीकडेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये अशांतता वाढली आहे. ही घटना ताजी असताना इस्रायलने अचानक इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शनिवारी सकाळी इस्रायलने इराणवर "प्रीएम्प्टिव स्ट्राइक" हल्ला केल्याचा दावा केला.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सांगितलं की, हा हल्ला संभाव्य धोक्याला प्रतिसाद म्हणून करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर, संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. कारण सरकारला भीती आहे की, या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात इराणही ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतो. या घटनेनंतर आता इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी सायरन वाजवले जात आहेत.
advertisement
इस्रायली मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत सुमारे ३० इराणी लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांचे निवासस्थान आणि गुप्तचर मुख्यालय यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या इस्रायली अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की हल्ल्यादरम्यान इराणी राष्ट्रपतींची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, या प्रकरणाबाबत इराणकडून कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही.
advertisement
advertisement
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, मध्य पूर्वेतील परिस्थिती अचानक अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. शनिवारी सकाळी इस्रायलने दावा केला की, त्यांनी इराणवर आगाऊ हल्ला केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सांगितले की ही कारवाई संभाव्य धोक्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर, संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran News: युद्ध पेटलं, इस्त्रायलचा इराणवर शक्तीशाली हल्ला, जगाला धडकी भरवणारा VIDEO
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement