advertisement

Nashik News: प्रवाशांनी भरलेलं विमान; अचानक एअरहोस्टेसची तब्येत बिघडली अन्... नाशकात काय घडलं?

Last Updated:

Nashik News: बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांना टर्मिनल मधून विमानाकडे नेण्यात आले. मात्र, त्याचवेळी एका हवाई सुंदरीची तब्येत अचानक बिघडली.

Nashik News: बंगळुरूकडे निघालेलं प्रवाशांनी भरलेलं विमान; अचानक एअरहोस्टेसची तब्येत बिघडली अन्..नाशकात काय घडलं?
Nashik News: बंगळुरूकडे निघालेलं प्रवाशांनी भरलेलं विमान; अचानक एअरहोस्टेसची तब्येत बिघडली अन्..नाशकात काय घडलं?
नाशिक: गेल्या काही काळात विमानसेवेचा खोळंबा आणि अपघात याचीच चर्चा सर्वत्र आहे. अशातच नाशिकच्या ओझर विमानतळावरून एक महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवारी दुपारी बंगळुरूकडे जाणारे विमान झेपावण्यापूर्वी हवाई सुंदरीची तब्येत बिघडली. त्यामुळे दुपारी जाणारे विमान ओझर विमानतळावरच थांबले. हवाई सुंदरीवर उपचार आणि विश्रांतीसाठी वेळ गेला आणि तब्बल 5 तास उशिरा म्हणजेच रात्री नऊ वाजता विमान बंगळुरूकडे झेपावले.
नाशिकमधील ओझर विमानतळ येथून इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा सुरू आहे. सध्या दिल्लीसह दोन विमानसेवा खंडित आहेत. तर अन्य सेवा या सुरळीत सुरू आहेत. मात्र, शुक्रवारी अचानक घडलेल्या घटनेनं प्रवाशांचा खोळंबा झाला.
नेमकं घडलं काय?
शुक्रवारी दुपारी 3:40 वाजता बंगळुरूकडे जाण्यासाठी विमान दाखल झाले होते. त्यानंतर 20 मिनिटांनी ते बंगळुरूला जाणार होते. त्यामुळे बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांना टर्मिनल मधून विमानाकडे नेण्यात आले. मात्र, त्याचवेळी एका हवाई सुंदरीची तब्येत अचानक बिघडली. मेडिकल इमर्जन्सी असल्याचे सांगून पुन्हा प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्ये नेण्यात आले.
advertisement
हवाई सुंदरीवर उपचार
या घटनेनंतर हवाई सुंदरीवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी विमान बंगळुरसाठी रवाना झाले. या प्रकारामुळे प्रवाशांचे हाल झाले असून विमान थांबल्यानंतर पुन्हा ते केव्हा उड्डाण घेणार याची कल्पना दिली जात नव्हती, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
प्रवाशांची नाराजी
दरम्यान, प्रवाशांना विमान पुन्हा केव्हा निघणार याची कल्पना दिली जात नव्हती. त्यामुळे अनेकांनी तिकीट रद्द केल्याचे समजते. पुढे जवळपास दीड तासानंतर विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झेपावेल असे सांगण्यात आले. परंतु, तोपर्यंत 5 तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: प्रवाशांनी भरलेलं विमान; अचानक एअरहोस्टेसची तब्येत बिघडली अन्... नाशकात काय घडलं?
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement