TRENDING:

Numerology: संघर्षाची सवय झाली होती! या मूलांकाचे आता भाग्य उजळणार, खुशखबर-आर्थिक लाभ

Last Updated:

Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 मार्च 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

1 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आपणास वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. दिवसभर भरपूर उर्जादायी वाटेल. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला पोटाची तक्रार जाणवू शकते. त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्या. त्याचा सकारात्मक परिणाम होईल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

2 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. पालकांचा पाठिंबा मिळेल. आज पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला सन्मानाकारक संधी मिळतील. कुटुंबाशी संबंध छान राहातील. कुटुंबाशी प्रेमाचे संबंध ठेवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

3 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या माहितीपूर्ण कथनाचं कौतुक होईल. लोक तुमचा सल्ला घेऊन काम करतील. तुम्हाला एखाद्या सरकारी शैक्षणिक संस्थेत जाण्याचा विचार करु शकता. आजचा दिवस एकूणातच फलदायी असल्याचं सिद्ध होईल. आज कोणालाही योग्य विचार न करता सल्ला देऊ नका, अन्यथा तुमच्या नावलौकिकावर परिणाम होईल.

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

4 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला नाही. सरकारकडून एखादी नोटीस येईल अशी शक्यता आहे. वडिलांची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक बाबींमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची मानहानी तुम्हाला विचलित करेल. जोडीदाराबरोबर नीट राहाणं तुमच्या हिताचं ठरेल.

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

5 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही बराच काळ ठरवत असलेलं काहीतरी पूर्ण करायची संधी आज मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी दिवस योग्य आहे. पैसे काळजीपूर्वक गुंतवा नाही तर ते अडकून पडण्याची शक्यता आहे. बहीण आणि मुलगी यांच्या सल्ल्याने पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल.

शेवटी ज्याची त्याची वेळ..! आपण किती वर्षे जगणार मनगटावरील या रेषा बघून कळू शकेल

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

6 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सर्वसाधारण आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. संघर्ष करु नका. कोणीतरी तुमच्याशी हुज्जत घालेल आणि तुमचा तोल जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही शांत राहा असा सल्ला देण्यात आला आहे. घरीही काही मुद्द्यांवरुन वाद होण्याची शक्यता आहे. वडिल, बहीण आणि मुलगी यांच्याशी चांगले संबंध ठेवा. कोणतंही महत्त्वाचं काम ठरवण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करा.

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

7 जन्मांक असलेल्या व्यक्तींच्या अडचणी आज दूर होताना दिसतील मात्र वडिलांच्या प्रकृतीबाबत सतर्क राहाण्याची गरज आहे. खर्च वाढल्यामुळे मानसिक ताण वाढेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या, त्याला काही त्रास होण्याची शक्यता आहे. एखाद्या विषयावरुन कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला दोष देईल, तेव्हा कुणालाही कटू शब्द बोलू नका.

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

8 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला नाही. प्रत्येक कामात अडथळे येतील. आज सूर्याला पाणी अर्पण केलं तर तुमचा ताण कमी होईल. शनिदेवाला अर्घ्य दिलं तर तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. त्यामुळे तुम्ही विचलित राहाल. कुटुंबातील वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि रागावर नियंत्रण ठेवा.

राशी बदलून शनिचा उदय! या राशींच्या खूप काही पथ्यावर पडणार, भाग्य उजळण्याचे योग

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

9 जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला ठरेल. सर्व नियोजित कामं आज पूर्ण होतील. पैसा आणि प्रकृतीच्या आघाडीवरील अडथळे संपण्याच्या मार्गावर आहेत. आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात कराल त्यामुळे मनाने दिवसभर आनंदी राहाल. आईवडिल आणि मुलांकडून भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळेल.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: संघर्षाची सवय झाली होती! या मूलांकाचे आता भाग्य उजळणार, खुशखबर-आर्थिक लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल