Palmistry: शेवटी ज्याची त्याची वेळ..! आपण किती वर्षे जगणार हे मनगटावरील या रेषा बघून कळू शकेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Palmistry: सामान्यतः हातावरील जीवनरेषा पाहून आयुष्य लहान असेल की मोठे हे जाणता येते. पण जीवनरेषेशिवाय हस्तरेषाशास्त्रात आणखी एक पद्धत सांगितली आहे ज्याद्वारे वय जाणून घेता येते.
मुंबई : हिंदू धर्मात असं मानलं जातं की, माणसाचे आयुष्य हे जन्माच्या वेळीच ठरलेले असते. म्हणजेच त्याच्या मृत्यूचा क्षण हा जन्मासोबतच निश्चित होतो. पण आयुष्याचा हा शेवट कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, हस्तरेषाशास्त्राद्वारे माणूस किती वर्षे जगेल याचा अंदाज बांधता येतो. सामान्यतः हातावरील जीवनरेषा पाहून आयुष्य लहान असेल की मोठे हे जाणता येते. पण जीवनरेषेशिवाय हस्तरेषाशास्त्रात आणखी एक पद्धत सांगितली आहे ज्याद्वारे वय जाणून घेता येते.
मणिबंध रेखा (मनगटाची रेषा)
जीवनरेषेव्यतिरिक्त मणिबंध रेषा पाहूनही माणसाचे वय किती असेल हे समजू शकते. मणिबंध रेषा या मनगट आणि तळहाताच्या मध्यभागी आडव्या असतात आणि त्यांची संख्या एकापेक्षा जास्त असू शकते. या मणिबंध रेषांवरून आपल्याला कळते की एखादी व्यक्ती किती वर्षे जगू शकेल.
काहींचा असा विश्वास आहे की, एखाद्या व्यक्तीचे वय जाणून घेण्यासाठी पुरुषांच्या उजव्या हाताची आणि महिलांच्या डाव्या हाताची मणिबंध रेषा पाहिली पाहिजे.
advertisement
रेषा जितक्या जास्त तितके आयुष्य जास्त - मणिबंध रेषा जितक्या जास्त असतील तितके त्या व्यक्तीचे आयुष्य जास्त असते. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या हातात ३ ते ४ मणिबंध रेषा असतात तो दीर्घायुषी ठरतो. त्याचे वय ७० ते ८० वर्षांच्या दरम्यान असू शकते. २ मणिबंध रेषा असलेल्या व्यक्तीचे सरासरी वय ५० वर्षे असू शकते. तर ज्यांच्या हातात फक्त एकच मणिबंध रेषा असते त्यांचे आयुष्य कमी असते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात ५ मणिबंध रेषा असतील तर तो १०० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतो.
advertisement
जर मणिबंध रेषा हलक्या आणि पातळ असतील तर त्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. तर खोल आणि जाड मणिबंध रेषा निरोगी जीवन दर्शवतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Palmistry: शेवटी ज्याची त्याची वेळ..! आपण किती वर्षे जगणार हे मनगटावरील या रेषा बघून कळू शकेल







