रविवारचा दिवस आपल्यासाठी बरा आहे. दीर्घकालीन चाललेल्या पैशांशी संबंधित समस्या आज संपतील. पैसा काही धार्मिक कार्यासाठी वापरा, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. तुमचं नाव आणि कीर्ती वाढेल. व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल. आज अनावश्यक खर्च होईल.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आजचा रविवारचा दिवस आनंदाचा असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयात कुटुंबीय तुमच्या पाठीशी उभे राहतील. नोकरदारांसाठी दिवस चांगला आहे. नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ आहे.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज रविवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. पैशाच्या बाबतीत कोणतीही कठीण समस्या उद्भवणार नाही. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. व्यवसायात प्रगती होईल. तुमचं नाव आणि दर्जा वाढेल. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी प्रेमानं वागा, फायदेशीर ठरेल.
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य! नव्या महिन्याची सुरुवात लकी
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज पैसे गुंतवण्याचे योग्य नियोजन करा. अन्यथा नंतर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. कुटुंबासाठी दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या शुभकार्याचं नियोजन करू शकता. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज रविवारी पैशाच्या बाबतीत अडचणी वाढू शकतात. अचानक आर्थिक नुकसान होईल. व्यवसायासाठी दिवस अनुकूल नाही. त्यामुळे व्यवसायाच्या अनुषंगाने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील.
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा रविवार आर्थिक बाबतीत चांगला आहे. तज्ज्ञाच सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होईल. व्यवसायासाठी दिवस सामान्य आहे. आजचा दिवस कुटुंबासोबत सामान्य आहे. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल.
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवार तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्या सर्व अडचणी दूर होतील. आपणास दिवसभर उत्साही आणि सकारात्मक वाटेल. ऑफिसमध्ये प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिनं नशीब तुमच्या बाजूनं आहे. मित्राचा किंवा सहकाऱ्याचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळेल. कुटुंबासोबत दिवस आनंदात जाईल. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल.
मेष वृषभ मिथुन कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य! सप्टेंबरची सुरुवात गोड, पण..
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्ही मालमत्ता खरेदीमध्ये पैसे गुंतवू शकता. त्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिनं भागीदारीसाठी नवीन प्रस्ताव मिळू शकतात. आजचा दिवस हा तुमच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. कुटुंबासाठी दिवस चांगला जाईल.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज रविवारचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. आज अचानक पैसे मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुम्ही तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवण्याचे नियोजन आज करू शकता. त्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसायात तुमच्या भावांकडून सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम नेहमीपेक्षा चांगले होईल. कुटुंबासोबत दिवस प्रेमानं जाईल. जोडीदारासोबत काही वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत शांत राहा आणि रागावू नका.