उज्जैन : ज्योतिष शास्त्रानुसार, रत्न आणि अंगठी व्यक्तीचे नशिब पालटू शकते. काही लोकांना रत्न किंवा धातूपासून तयार केलेली अंगठी घालण्याची आवडत असते. तर राशीमध्ये ग्रहांची स्थितीनुसार, रत्नाला धारण करायला हवे. अनेका जण सोन्याचे दागिने घालणे पसंत करतात. मात्र, सोने प्रत्येकाला फायदेशीर नाही. अनेकांना सोन्याचे दागिने घातल्यावर आयुष्यात कष्ट सहन करावे लागतात.
advertisement
कोणत्या बोटात सोन्याची अंगठी घालू नये -
– ज्योतिष शास्त्रानुसार, तर्जनी बोटात अंगठी घातल्याने सुख-समृद्धी येते. तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घालणे शुभ मानले जाते.
गड्यानं कमालंच केली, विमानाचं तिकीट झालं कॅन्सल, तर 1800 किलोमीटर कार चालवत पोहोचला, कारण काय?
– ज्योतिष शास्त्रानुसार, मध्यमा बोटात लोखंडाची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. तर मध्यमा अंगठीत चुकूनही सोन्याची अंगठी घालू नये. मध्यमा बोटात सोन्याची अंगूठी घातल्याने नकारात्मकता वाढते.
-ज्योतिष शास्त्रानुसार, अनामिका बोटात म्हणजे रिंग फिंगरमध्ये तांब्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. रिंग फिंगरचा संबंध सूर्याशी आहे. तांबे सूर्य देवाचा धातु आहे. यासाठी रिंग फिंगरात तांब्याची अंगठी घातल्याने लाभ मिळतो.
– ज्योतिष शास्त्रानुसार, कनिष्ठा बोटात चांदीची अंगठी घालणे फायदेशीर असते. लहान बोटात चांदीची अंगठी घातल्याने तणावातून सुटका होते. तसेच रागही कमी येतो आणि वैवाहिक जीवनही सुखदायी असते.
पितृ दोषामुळे आहे टेन्शन, तर वैशाख अमावस्येला आधी हे काम करा, मग पाहा फरक..
– ज्योतिष शास्त्रानुसार, जर जीवनात तणाव असेल आणि शांती नसेल तर अंगठ्यात चांदी किंवा प्लॅटिनमची अंगठी घालण्याच सल्ला दिला जातो. चांदी किंवा प्लॅटिनमची अंगठीत हीरा लावू शकतात. अंगठ्यामध्ये चांदीची किंवा प्लॅटिनमची अंगठी घातल्याने व्यक्तीला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही.
सूचना - ही माहिती ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.