TRENDING:

⁠Death Astro: मृत्युच्या आधी 6 महिन्यांपासून दिसतात एखाद्याच्या अशा गोष्टी; आपली ओळखण्यात होते चूक

Last Updated:

Garuda Purana Death Signs: भारतीय परंपरा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये, विशेषतः गरुड पुराणात, मृत्यूच्या आधी दिसणाऱ्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांचे सविस्तर वर्णन केले आहे. अंकशास्त्र आणि मेडिकल ॲस्ट्रोलॉजीतज्ज्ञ प्रीति सिंह यांच्या मते, या संकेतांकडे समाज आणि विज्ञान कशा पद्धतीने बघतो..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : काहींच्या बाबतीत कधी कधी असं होतं की, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक बदललेली जाणवते. कमी बोलणं, चेहऱ्यावरची शांतता आणि जणू काही आतल्या आत कसलीतरी तयारी सुरू आहे असं वाटणं... मृत्यू हे असं एक सत्य आहे ज्याबद्दल आपण सर्वजण जाणतो, पण त्यावर मोकळेपणाने फार कमी लोक बोलतात.
News18
News18
advertisement

भारतीय परंपरा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये, विशेषतः गरुड पुराणात, मृत्यूच्या आधी दिसणाऱ्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांचे सविस्तर वर्णन केले आहे. अंकशास्त्र आणि मेडिकल ॲस्ट्रोलॉजीतज्ज्ञ प्रीति सिंह यांच्या मते, या संकेतांकडे समाज आणि विज्ञान कशा पद्धतीने बघतो ते आपण समजून घेऊया.

धार्मिक समजुतींनुसार मानवी शरीरात 7 चक्रं असतात आणि मृत्यूची पहिली चाहूल नाभी चक्रात जाणवते. ही प्रक्रिया अचानक होत नाही, तर ती संथ असते. ग्रामीण भागातील ज्येष्ठ लोक आजही मानतात की, जेव्हा शरीराची ऊर्जा नाभीपासून कमकुवत होऊ लागते, तेव्हा शरीर संकेत देऊ लागतं. विज्ञान मात्र याला वेगळ्या नजरेने बघतं. डॉक्टरांच्या मते, गंभीर आजारपणात शरीराचे अवयव हळूहळू काम करणं थांबवतात, ज्यामुळे भूक कमी लागणं, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

advertisement

घरात अशाप्रकारचे फोटो लावण्याची चूक महागात पडते, वास्तूदोष वाढून कुटुंबात तणाव

यमदूत की भास?

गरुड पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूच्या आधी व्यक्तीला यमदूत दिसू शकतात. अनेक कुटुंबांमध्ये असे अनुभव येतात जिथे रुग्ण म्हणतो की, कोणीतरी त्याला बोलवतंय किंवा खोलीत कोणीतरी उभं आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शेवटच्या काळात ऑक्सिजनची कमतरता, औषधांचा परिणाम किंवा मानसिक स्थितीमुळे भास (hallucinations) होऊ शकतात. पण श्रद्धेनुसार, ही आत्म्याच्या परलोक प्रवासाची तयारी मानली जाते.

advertisement

सावली धूसर होणं आणि श्वासाची गती बदलणं - असंही मानलं जातं की, मृत्यूच्या काही काळ आधी व्यक्तीला स्वतःची सावली धूसर दिसू लागते किंवा त्याला स्वतःच्या नाकाचा शेंडा दिसत नाही. श्वासाची गती सुद्धा बदलते - कधी मंद, तर कधी अनियमित. याला मेडिकल भाषेत 'चेन-स्टोक्स रेस्पिरेशन' असं म्हणतात, जे अनेक गंभीर रुग्णांमध्ये दिसून येतं.

advertisement

मानसिक आणि भावनिक बदल - आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत व्यक्ती कमालीची शांत होते. जणू काही आता तक्रार करण्यासारखं काही उरलेलंच नाही. काही लोक बालपणातील आठवणी किंवा अधुऱ्या राहिलेल्या कामांबद्दल बोलू लागतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा व्यक्तीला आपला शेवट जवळ आल्याचं जाणवतं, तेव्हा तो स्वतःच्या आयुष्याचं मूल्यमापन करू लागतो. यामुळेच पश्चात्ताप किंवा समाधानासारखे भाव चेहऱ्यावर उमटतात.

advertisement

बॅडलक संपणार! मार्चच्या सुरुवातीलाच शनि-सूर्याची महायुती, या राशींना दुहेरी लाभ

गेलेल्या नातेवाइकांचा भास होणं - काही लोकांना आपले गेलेले आई-वडील किंवा नातेवाईक आजूबाजूला असल्याचा भास होतो. धार्मिक मान्यतेनुसार, परलोकातून बोलावणं येतं आणि पूर्वज साथ देण्यासाठी येतात. तर विज्ञानाच्या मते, ही एक न्यूरोलॉजिकल प्रक्रिया आहे.

श्रद्धा की विज्ञान: समाज कुठे आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रॅक्टरसारखं मजबूत बाईकचं टायर, किंमतही कमी, उन्हाळ्यात बेस्ट!
सर्व पहा

भारतात मृत्यू ही केवळ एक जैविक घटना मानली जात नाही, तर तो एक आध्यात्मिक प्रवास मानला जातो. खेड्यापाड्यात आजही हे संकेत गांभीर्याने घेतले जातात, तर शहरात शिकलेला वर्ग विज्ञानावर विश्वास ठेवतो. तरीही दोन्ही विचारसरणी एका गोष्टीवर एकत्र येतात, ती म्हणजे - आयुष्य मर्यादित आहे. त्यामुळे आपल्या माणसांशी संवाद साधणं, रिलेशनमधले अडथळे दूर करणं आणि मनाची शांती मिळवणं गरजेचं आहे. मृत्यूचे हे संकेत म्हणजे धार्मिक सत्य असो वा वैज्ञानिक प्रक्रिया, त्यातून मिळणारा संदेश एकच आहे - आयुष्य सजगपणे आणि प्रेमाने जगा, कारण शेवटची वेळ अनिश्चित आहे.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
⁠Death Astro: मृत्युच्या आधी 6 महिन्यांपासून दिसतात एखाद्याच्या अशा गोष्टी; आपली ओळखण्यात होते चूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल