TRENDING:

सोनं-चांदीच्या दरात घसरण! घसरलेल्या किमतीमुळे 'या' मूलांकांचे लोक होणार मालामाल, कोण ठरणार लकी?

Last Updated:

सध्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प आणि जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे दर 1.50 लाखांच्या जवळ, तर चांदी 3 लाखांच्या खाली आली आहे. अशा स्थितीत अनेकजण खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Gold-Silver Rate And Numerology : सध्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प आणि जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे दर 1.50 लाखांच्या जवळ, तर चांदी 3 लाखांच्या खाली आली आहे. अशा स्थितीत अनेकजण खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मात्र, अंकशास्त्रानुसार मूलांक 1 आणि मूलांक 2 च्या व्यक्तींसाठी या धातूंची खरेदी केवळ दागिना म्हणून नाही, तर 'भाग्य' चमकवणारी गुंतवणूक ठरू शकते. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक धातूचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो. जेव्हा आपण आपल्या मूलांकाला पूरक असलेला धातू परिधान करतो किंवा त्याची खरेदी करतो, तेव्हा त्या ग्रहाची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.
News18
News18
advertisement

मूलांक 1 आणि सोने: 'सूर्या'सारखी प्रखर प्रगती

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी 'सूर्य' आहे. सोने हा धातू सूर्याचे प्रतीक मानला जातो. मूलांक 1 च्या व्यक्तींनी सोन्यात गुंतवणूक करणे किंवा सोन्याचे दागिने परिधान करणे अत्यंत शुभ असते. जेव्हा सोन्याचे भाव कमी होतात, तेव्हा मूलांक 1 च्या व्यक्तींनी सोन्याचे नाणे किंवा वळी खरेदी करावी. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि समाजात मान-सन्मान मिळतो. जर तुमचे करिअर थांबले असेल, तर या काळात सोने खरेदी केल्याने तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः सोन्याची अंगठी अनामिकेत घालणे तुमच्यासाठी भाग्योदय करणारे ठरेल.

advertisement

मूलांक 2 आणि चांदी: 'चंद्रा'सारखी शीतलता आणि समृद्धी

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. या मूलांकाचा स्वामी 'चंद्र' आहे. चांदी हा धातू चंद्राचे प्रतीक असून तो शीतलता आणि मनावर नियंत्रण देणारा मानला जातो. मूलांक 2 च्या लोकांसाठी चांदी ही 'सौभाग्याची धातू' आहे. सध्या चांदीच्या दरात 30% ते 35% घसरण झाली आहे. मूलांक 2 च्या व्यक्तींसाठी ही 'लकी' संधी आहे. चांदीची गुंतवणूक केल्याने या व्यक्तींच्या मनातील द्विधा अवस्था दूर होते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. जर तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल, तर चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे किंवा चांदीचे कडे घालणे तुमच्यासाठी चमत्कारी ठरेल. या काळात चांदी खरेदी केल्याने तुमच्या घरातील सुख-शांतीत वाढ होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
टाकाऊ मूर्तींपासून टिकाऊ कलाकृती, तृप्ती यांचा पर्यावरण पूरक उपक्रम, Video
सर्व पहा

सोन्या-चांदीच्या दरातील ही घसरण मूलांक 1 आणि 2 च्या लोकांसाठी नशिबाची दार उघडणारी आहे. जर तुम्ही या मूलांकाचे असाल, तर या संधीचा फायदा घेऊन स्वतःचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
सोनं-चांदीच्या दरात घसरण! घसरलेल्या किमतीमुळे 'या' मूलांकांचे लोक होणार मालामाल, कोण ठरणार लकी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल