TRENDING:

टाकाऊ मूर्तींपासून टिकाऊ कलाकृती, तृप्ती यांचा पर्यावरण पूरक उपक्रम, अश्या बनवतात वस्तू, Video

Last Updated:

हीच समस्या ओळखून नाशिकमधील अ‍ॅड. तृप्ती गायकवाड यांनी पर्यावरण संवर्धन आणि श्रद्धेची जोपासना करणारा एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, त्यातून टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत सुंदर आणि टिकाऊ शोभेच्या वस्तू घडवल्या जात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : आपल्या घरातील देवघरात असलेल्या खंडित मूर्ती किंवा जुन्या फोटोंचे काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. श्रद्धेपोटी लोक या वस्तू झाडाखाली किंवा गोदावरीच्या पात्रात विसर्जित करतात, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते आणि शहराचे विद्रुपीकरण होते. हीच समस्या ओळखून नाशिकमधील अ‍ॅड. तृप्ती गायकवाड यांनी पर्यावरण संवर्धन आणि श्रद्धेची जोपासना करणारा एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, त्यातून टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत सुंदर आणि टिकाऊ शोभेच्या वस्तू घडवल्या जात आहेत.
advertisement

एका प्रसंगाने बदलली दृष्टी

काही काळापूर्वी गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी तृप्ती गेल्या होत्या. तिथे एक व्यक्ती देवाची मोठी फोटो फ्रेम नदीत टाकत असताना त्यांना दिसली. तृप्ती यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याचे महत्त्व आणि पर्यायी वापराबाबत मार्गदर्शन केले. या एका प्रसंगानंतर त्यांना 'संपूर्णम सेवा फाउंडेशन' स्थापन करण्याची संकल्पना सुचली. सुरुवातीचा प्रवास कठीण होता, मात्र आज नाशिकसह आसपासच्या गावांमधूनही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

advertisement

Success Story : डिलिव्हरी बॉय झाला मालक! सायलीची साथ अन् राहुल झाला बॉस, महिन्याला इतकी कमाई

शास्त्रीय आणि धार्मिक पद्धतीचा अवलंब

येणाऱ्या मूर्ती किंवा फोटोंची धार्मिक विटंबना होऊ नये, याची विशेष काळजी तृप्ती आणि त्यांची टीम घेते. संकलित केलेल्या मूर्ती किंवा फोटोंची प्रथम विधिवत उत्तर पूजा केली जाते. त्यानंतर, त्यातील धातू, काच किंवा लाकडाचा वापर करून नवीन वस्तू घडवल्या जातात. यासाठी लागणारा विधीचा खर्च घेऊन या वस्तूंना पुनरुज्जीवित केले जाते.

advertisement

टाकाऊतून काय बनते?

तृप्ती गायकवाड यांच्या संपूर्णम केंद्रात जमा होणाऱ्या वस्तूंपासून कल्पक नवनिर्मिती केली जाते.

धातू आणि काच: यापासून आकर्षक बेंचेस, नवीन फ्रेम्स, भेटवस्तू आणि खेळणी तयार केली जातात.

देववस्त्र आणि कापड: जुन्या वस्त्रांपासून उबदार ब्लँकेट, चादरी आणि विविध कव्हर्स बनवली जातात.

रोजगाराची संधी आणि सामाजिक भान

हा केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेले माझे कर्तव्य आणि पर्यावरणाची आवड आहे. यातून अनेक गरजू हातांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता आली, याचे मोठे समाधान आहे, असे अ‍ॅड. तृप्ती गायकवाड सांगतात.

advertisement

तुम्हीही देऊ शकता योगदान

तुमच्या घरातील जुन्या मूर्ती, फोटो फ्रेम किंवा देववस्त्रे टाकून न देता ती निसर्ग वाचवण्यासाठी संपूर्णमला दान करा.

पत्ता: संपूर्णम सेवा फाउंडेशन, काश्मिरे माला, झिगझॅग मार्ग, मखमलाबाद रोड, रुंगठा बिझनेस इंडेक्स, नाशिक.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
टाकाऊ मूर्तींपासून टिकाऊ कलाकृती, तृप्ती यांचा पर्यावरण पूरक उपक्रम, Video
सर्व पहा

अधिक माहितीसाठी: इंस्टाग्राम पेज.  sampurnam_2019 वर संपर्क साधू शकता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
टाकाऊ मूर्तींपासून टिकाऊ कलाकृती, तृप्ती यांचा पर्यावरण पूरक उपक्रम, अश्या बनवतात वस्तू, Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल