advertisement

नाशिकमध्ये दुचाकी चोरांचा धुमाकूळ, पंचवटीसह ही 3 ठिकाणे हॉटस्पॉट, धक्कादायक आकडेवारी समोर

Last Updated:

Nashik News: "आमच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणे जास्त असल्याने चोऱ्या होतात," असं सांगून पोलिस जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नाशिकमध्ये दुचाकी चोरांचा धुमाकूळ, पंचवटीसह ही 3 ठिकाणे हॉटस्पॉट, धक्कादायक आकडेवारी समोर
नाशिकमध्ये दुचाकी चोरांचा धुमाकूळ, पंचवटीसह ही 3 ठिकाणे हॉटस्पॉट, धक्कादायक आकडेवारी समोर
नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. दररोज सरासरी दोन किंवा त्याहून अधिक दुचाकी चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांना आव्हान देत चोरट्यांनी आता भरवस्तीत हातसाफ करण्यास सुरुवात केली असून, गेल्या सहा महिन्यांत तब्बल 390 दुचाकींची चोरी झाली आहे.
ही आहेत चोरीची 'हॉटस्पॉट'
पोलिसांच्या मते सरकारवाडा, पंचवटी आणि मुंबई नाका ही क्षेत्रे दुचाकी चोरीचे मुख्य केंद्र बनली आहेत. सार्वजनिक स्थळे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरातून वाहने गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. धक्कादायक म्हणजे, घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्याही आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत.
advertisement
पाच मिनिटांत दोन बर्गमन लंपास!
चोरट्यांच्या धाडसाचा कळस नुकताच पाहायला मिळाला. जुने नाशिकमधील चौक मंडई परिसरातून सकाळी पावणेअकराच्या सुमारास चोरट्यांनी एक 'बर्गमन' दुचाकी चोरली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत, त्याच दुचाकीचा वापर करून राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित बिल्डिंगच्या पार्किंगमधून दुसरी 'बर्गमन' लंपास केली. या थरारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कागदावरचे पथक अन् पोलिसांचा 'जावईशोध'
वाहन चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेने स्वतंत्र पथक नियुक्त केले असले तरी त्याचा प्रभाव शून्य दिसत आहे. "आमच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणे जास्त असल्याने चोऱ्या होतात," असा अजब 'जावईशोध' लावून पोलिस आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
advertisement
आकडेवारी काय सांगते?
  • गेल्या सहा महिन्यांतील चोरी:390 दुचाकी
  • जानेवारीतील चोरी:62 दुचाकी
  • गोदाघाट परिसर:चोरीचे 40 टक्के प्रमाण
  • सर्वाधिक चोऱ्यांचा काळ:ऑक्टोबर ते नोव्हेंबर
गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये दुचाकी चोरांचा धुमाकूळ, पंचवटीसह ही 3 ठिकाणे हॉटस्पॉट, धक्कादायक आकडेवारी समोर
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement