मार्गी गुरूचा काळ
गुरू ग्रह 11 मार्च 2026 रोजी मार्गी होईल आणि 1 जून 2026 पर्यंत तो मिथुन राशीत सरळ चालीने भ्रमण करेल. या 3 महिन्यांच्या काळात रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. गुरूची सरळ चाल म्हणजे नशिबाची साथ आणि बुद्धीचा योग्य वापर होय.
मिथुन - आत्मविश्वासात वाढ आणि प्रगती
गुरू तुमच्याच राशीत मार्गी होत आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल. निर्णय घेताना होणारा गोंधळ दूर होऊन स्पष्टता येईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तसेच, विवाहासाठी इच्छुक असलेल्या जातकांचे विवाह जमण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
सिंह - आर्थिक समृद्धी आणि लाभ
सिंह राशीसाठी गुरूचे हे परिवर्तन अकराव्या भावात होणार आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अत्यंत लाभदायक आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
तूळ - भाग्योदय आणि धार्मिक प्रवास
तुमच्या नवव्या भावात गुरू मार्गी होत आहे. यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. परदेश प्रवासाचे योग येतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वडिलांकडून किंवा गुरुतुल्य व्यक्तींकडून तुम्हाला मोलाचे सहकार्य आणि आर्थिक मदत लाभेल.
कुंभ - संतान सुख आणि प्रेम यश
कुंभ राशीच्या पाचव्या भावात गुरूची सरळ चाल सुरू होईल. यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जे लोक सर्जनशील क्षेत्रात किंवा शेअर मार्केटमध्ये आहेत, त्यांना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुमची कल्पकता तुम्हाला नवीन उंचीवर नेईल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
