TRENDING:

Holi Dahan 2026: होळीनंतर उरलेली राख फेकू नका; इतक्या कामांसाठी केलेला वापर शुभफळदायी

Last Updated:

Holi Astrology: आपल्याकडे कोकणापासून विदर्भापर्यंत होळीच्या राखेचे अनेक चमत्कारिक उपाय सांगितले जातात. येत्या 2 मार्च 2026 रोजी होळी पेटली की, त्यानंतरची ही राख तुमचं नशीब कसं पालटू शकते, ते आपण जरा वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : होळीनंतर उरलेली राख ही साधीसुधी नसते. हिंदू धर्मात या राखेला खूप पवित्र मानलं जातं. आपल्याकडे कोकणापासून विदर्भापर्यंत होळीच्या राखेचे अनेक चमत्कारिक उपाय सांगितले जातात. येत्या 2 मार्च 2026 रोजी होळी पेटली की, त्यानंतरची ही राख तुमचं नशीब कसं पालटू शकते, ते आपण जरा वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया.
News18
News18
advertisement

होळीची राख जर एखाद्या छोट्या लाल रंगाच्या कापडात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवली, तर घराला कोणाची दृष्ट लागत नाही आणि विनाकारण होणारी पैशांची गळती थांबते. लक्ष्मी घरात टिकून राहते असं आपले जुने लोक सांगतात. तसंच घराच्या मुख्य उंबरठ्यावर थोडीशी राख टाकली की घरातली नकारात्मकता बाहेर पडते आणि घरात प्रसन्न वाटू लागतं.

advertisement

जर तुमचं दुकान असेल किंवा तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असाल, तर तुमच्या गल्ल्यात किंवा जिथे तुम्ही हिशोबाची वही ठेवता, तिथे थोडीशी राख ठेवा. यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी प्रसन्न होते अशी लोकांची भावना आहे. प्रगतीची रखडलेली चाकं यामुळे पुन्हा फिरू लागतात.

advertisement

आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटणार! मेष राशीत शनिचे आगमन या राशींना आनंदी-आनंदाचे

ग्रहदोष आणि शरीराची शुद्धी - ज्यांच्या पत्रिकेत ग्रहांची पीडा आहे किंवा शनी, राहू, केतूचा त्रास जाणवतोय, त्यांनी ही राख शिवलिंगाला व्हायची. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्रद्धेने हा उपाय केला जातो. जर शरीरात खूप आळस असेल किंवा मन सारखं अस्वस्थ होत असेल, तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर राख टाकून अंघोळ करा. यामुळे मनावरचा आणि शरीरावरचा ताण हलका होतो असं मानलं जातं.

advertisement

आजारी माणसासाठी, दृष्ट काढण्यासाठी - घरात एखादं लहान मूल किंवा वयस्कर माणूस सारखा आजारी पडत असेल, तर त्यांच्या डोक्यावरून ही राख 7 वेळा उतरवून एखाद्या चौकात नेऊन टाकायची. जुन्या काळी दृष्ट काढण्यासाठी हा उपाय हमखास केला जायचा. शनीचा त्रास कमी करण्यासाठी ही राख शिवलिंगाला अर्पण करणं खूप फायदेशीर ठरतं. कोणाला दृष्ट लागली असेल, तर या राखेमध्ये थोडं मीठ आणि मोहरी मिसळून ते मिश्रण पीडित व्यक्तीवरून उतरवायचं आणि चौकात टाकून द्यायचं. यामुळे लागलेली नजर लगेच उतरते आणि त्या व्यक्तीला आराम मिळतो.

advertisement

बॅडलक संपणार! मार्चच्या सुरुवातीलाच शनि-सूर्याची महायुती, या राशींना दुहेरी लाभ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीच्या खास शेतीचा Ground Report
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Holi Dahan 2026: होळीनंतर उरलेली राख फेकू नका; इतक्या कामांसाठी केलेला वापर शुभफळदायी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल