मनात संभ्रम पण भरपूर संधी - वर्ष 2026 मध्ये राहू S नाव असलेल्या लोकांच्या पहिल्या भावात म्हणजेच प्रथम स्थानात असेल. राहू जेव्हा पहिल्या भावात असतो, तेव्हा तो चंद्रावर थेट प्रभाव पाडतो, ज्यामुळे मन थोडे भ्रमित राहू शकते. तुम्हाला काहीतरी नवीन करायचे असेल, पण ते करावे की नाही याबद्दल संभ्रम राहील. मात्र, घाबरण्याची गरज नाही, कारण हाच संभ्रम तुमच्या मनात नवीन आणि कल्पक कल्पना घेऊन येईल.
advertisement
आर्थिक प्रगती आणि मोठे निर्णय - S अक्षरानं नाव सुरू होणाऱ्या लोकांच्या दुसऱ्या भावात शनी असेल. हे स्थान धन आणि कुटुंबाचे मानले जाते. ही स्थिती आर्थिक दृष्टीने खूप चांगले आहे. जर तुम्ही मोठी गुंतवणूक, मालमत्ता खरेदी किंवा दीर्घकालीन नियोजनाचा विचार करत असाल, तर 2026 मध्ये ते पूर्ण होऊ शकते.
प्रेमसंबंधात सकारात्मक बदल - देवगुरु बृहस्पती तुमच्या पाचव्या भावात असतील, जो प्रेम आणि संततीशी संबंधित आहे. याचा अर्थ तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. जर कोणाशी मतभेद सुरू असतील तर ती व्यक्ती स्वतःहून परत येण्याचा प्रयत्न करू शकते. जून महिन्यापूर्वी प्रेमसंबंधात एखादी चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. मे किंवा जूननंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या सहाव्या भावात जातील, जिथे ते उच्च मानले जातात. याचा थेट फायदा असा होईल की तुमचे कर्ज, आजारपण आणि शत्रू स्वतःहून कमकुवत होऊ लागतील. जूननंतर तुमचे खर्च नक्कीच वाढतील, पण हे खर्च शुभ कार्यांसाठी किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी असतील.
वैवाहिक जीवनात संयम आवश्यक - S नाव असलेल्या लोकांच्या 7 व्या भावात केतू असेल, जे विवाह आणि भागीदारीचे स्थान आहे. जे लोक विवाहित आहेत, त्यांना नात्यात थोडे लक्ष देणे आवश्यक असेल. केतूमुळे अलिप्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. परंतु समजूतदारपणा आणि संवादाने नाते जपले जाऊ शकते.
विवाह आणि कुटुंबाकडून आनंदाची बातमी -
जे लोक बऱ्याच काळापासून लग्नाची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बृहस्पतीचा प्रभाव दुसऱ्या भावावर (कुटुंब) पडल्यामुळे घरात एखादे मोठे शुभ कार्य घडू शकते. लग्न ठरण्याचे किंवा संतान सुखाचे प्रबळ योग या वर्षी तयार होत आहेत. करिअरच्या बाबतीत 2026 हे वर्ष तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देईल. सुरुवातीला या जबाबदाऱ्या ओझे वाटू शकतात, पण याच जबाबदाऱ्या तुम्हाला उच्च पदापर्यंत आणि मोठ्या यशापर्यंत घेऊन जातील. त्यामुळे जबाबदारीपासून मागे हटू नका, हीच तुमच्या प्रगतीची शिडी ठरेल.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
