या वर्षात मेष राशीच्या मंडळींना करिअरमध्ये प्रगतीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा बदलाची संधी मिळू शकते. मात्र या संधींबरोबरच कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि मानसिक दबावही वाढू शकतो. त्यामुळे सातत्याने मेहनत करताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल.
advertisement
आत्ताच थांबा! 'या' राशींच्या लोकांनी चुकूनही करू नका 'हे' काम, नाहीतर नवीन वर्षात होईल मोठं नुकसान
आर्थिक बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला, विशेषतः मार्चपर्यंत काही प्रमाणात खर्च वाढलेला जाणवेल. आर्थिक नियोजनावर ताण येऊ शकतो. मात्र मे महिन्यानंतर उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होईल. गुंतवणूक, शेअर मार्केट, व्यवसाय आणि व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. योग्य सल्ला आणि दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
प्रेम-संबंधांच्या दृष्टीने जुलै आणि ऑगस्ट हे महिने शुभ ठरतील. नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि स्थैर्य येईल. अविवाहितांसाठी या काळात योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक वातावरण राहील आणि घरात आपला सहभाग आणि जबाबदारी वाढेल.
आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक ताण, डोकेदुखी, झोपेच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे नियमित विश्रांती, ध्यान, व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक ठरेल. गुरूच्या शुभ दृष्टीमुळे शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. शनी या वर्षी तुमची परीक्षा घेईल, मात्र त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत आणि परिपक्व बनवेल. राहू-केतूच्या प्रभावामुळे जीवनात नवे बदल जाणवतील.
धार्मिक उपाय म्हणून मंगळवारी गणेश दर्शन करणे आणि अंगारक योगाच्या दिवशी “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करणे लाभदायक ठरेल. एकूणच, हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी मेहनत, संयम आणि यश यांचा सुंदर संगम ठरणार आहे, अशी माहिती गुरुजी शुभम पंचभाई यांनी दिली आहे.





