Astrology: कधीची आशा लावून बसलेलो! पहिल्याच महिन्यात या 4 राशींचे नशीब उजळणार, भाग्यचक्र फिरलं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
January Astrology: जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना असून पंचांगानुसार यात एकूण 31 दिवस असतात. या महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने याला विशेष महत्त्व आहे. जानेवारी 2026 मध्ये मकर संक्रांतीसारखे मोठे सण साजरे केले जातील. तसेच शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांसारख्या मोठ्या ग्रहांच्या चालीत बदल होणार आहेत. या बदलांचा विविध राशींवर चांगला परिणाम दिसेल. जानेवारी 2026 मध्ये ग्रहांची नक्षत्रे आणि राशी परिवर्तन काही विशिष्ट राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहेत. विशेषतः सूर्य आणि शुक्राची अनुकूल स्थिती या राशींना आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळवून देईल.
सिंह -सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना आर्थिक क्रांतीचा ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले होतील, ज्यामुळे दीर्घकाळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात पदोन्नतीसोबतच पगारवाढीची मोठी बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळण्याचे योग असून तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या अनुभवाचा आणि प्रामाणिकपणाचा सन्मान केला जाईल. उत्तरार्धात उत्पन्नात मोठी वाढ दिसून येईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मोठ्या कंपन्यांकडून आकर्षक ऑफर मिळतील. शेअर बाजारात किंवा सोन्यात केलेली गुंतवणूक या महिन्यात अपेक्षित परतावा देईल. तुमची कार्यक्षमता वाढल्यामुळे कामाचा ताण कमी होईल.
advertisement
वृश्चिक - आर्थिक स्थितीच्या बाबतीत वृश्चिक राशीसाठी जानेवारी महिना अत्यंत भाग्यवान ठरेल. आध्यात्मिक कार्यावरील खर्च तुम्हाला मानसिक शांती आणि भविष्यात लाभ मिळवून देईल. तुमच्या योजनांना यश मिळाल्यामुळे समाजात तुमचा प्रभाव वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या महिन्यात दुप्पट नफा मिळण्याची चिन्हे आहेत.
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात फायदेशीर ठरेल. पैतृक संपत्तीतून लाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनप्राप्ती होण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांचे पाठबळ मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी लागणारे भांडवल सहज उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठीण असला तरी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे.
advertisement
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना व्यावसायिक यशाचा असेल. तुमच्या सहकाऱ्यांचे वागणे अतिशय सकारात्मक राहील, ज्यामुळे कामाचे वातावरण आनंददायी असेल. लांबच्या प्रवासातून तुम्हाला मोठे व्यावसायिक लाभ मिळतील. व्यवसायात नवीन क्लायंट जोडले गेल्यामुळे आयपतीत वाढ होईल. धार्मिक कार्यावर खर्च केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. एकंदरीत प्रगती आणि कौटुंबिक सुखासाठी हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










