जगाचा वेग पुण्याच्या रस्त्यावर! 40 देशांतील 176 सायकलपटू, 'पुणे ग्रँड टूर'साठी जिल्हा प्रशासनाचं 'असं' नियोजन

Last Updated:

पुणे जिल्ह्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी 'पुणे ग्रँड टूर' ही सायकल स्पर्धा लवकरच पार पडणार आहे.

पुणे ग्रँड टूर
पुणे ग्रँड टूर
पुणे : पुणे जिल्ह्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी 'पुणे ग्रँड टूर' ही सायकल स्पर्धा लवकरच पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील ४० देशांतून १७६ आघाडीचे सायकलपटू आपला सहभाग नोंदवणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या दोन संघांसह आतापर्यंत २९ संघ निश्चित झाले आहेत. जपान आणि इतर काही महत्त्वाच्या देशांच्या संघांशीही प्रशासनाची बोलणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्याला पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून नावारूपास आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत त्यांनी सर्व विभागांना या मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेची विशेष बाब म्हणजे, 'युनियन सायकलिंग इंटरनॅशनल' (UCI) च्या अधिकृत दिनदर्शिकेत या स्पर्धेचा समावेश करण्यात आला असून तिचे थेट प्रक्षेपण जगभर केले जाणार आहे. एकूण ४३७ किलोमीटर अंतराची ही शर्यत चार टप्प्यांत विभागलेली असून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून मार्गस्थ होणार आहे. जगभरातील खेळाडू पुण्यात येणार असल्याने या भव्य सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची गरज भासणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, एनसीसी, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच ज्या ग्रामीण भागातून ही शर्यत जाणार आहे, तिथल्या सरपंचांनी स्थानिक गणेश मंडळे आणि तरुणांना या जागतिक उपक्रमाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना या कार्यात सहभागी करून घ्यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
जगाचा वेग पुण्याच्या रस्त्यावर! 40 देशांतील 176 सायकलपटू, 'पुणे ग्रँड टूर'साठी जिल्हा प्रशासनाचं 'असं' नियोजन
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement