न्यू इयरचं सेलीब्रेशन अन् रात्री 1.30 वाजता भयंकर बॉम्बस्फोट, जीव वाचवण्यासाठी धडपड, अनेकजण होरपळले
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
switzerland Blast: क्रॅन्स-मॉन्टाना येथील Le Constellation Bar मध्ये नववर्षाच्या पार्टीदरम्यान स्फोट व आगीत अनेकांचा मृत्यू, जखमी; स्वित्झर्लंड प्रशासन तणावात, तपास सुरू.
जगभरात नव्या वर्षाचं सेलीब्रेशन सुरू असताना एका हॉटेलमध्ये भयंकर स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. नव्या वर्षाच्या स्वागताची झिंग आणि आनंदोत्सव साजरा करत असताना झालेल्या या स्फोटानं शहर हादरुन गेलं. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित आल्प्स पर्वतरांगांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, क्रॅन्स-मॉन्टाना या प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहरात असलेल्या एका आलिशान बारमध्ये भीषण स्फोट झाल्याने प्रचंड तणावाचं वातावरण होतं. 'ले कॉन्स्टेलेशन बार अँड लाउंज' मध्ये झालेल्या या स्फोटामुळे तिथे भीषण आग लागली.
नेमकं काय घडलं?
क्रॅन्स-मॉन्टाना हे शहर स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगसाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचे आवडते शहर म्हणून ओळखलं जातं. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका बारमध्ये मोठी पार्टी सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये बारच्या इमारतीतून धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. या आगीत अनेक लोक होरपळले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
advertisement
Reports of Several people being killed in an Explosion and fire at Le Constellation Bar in the Swiss ski resort town of Crans-Montana, Switzerland, during New Year's Eve. pic.twitter.com/7R73zSKmIv
— Sussex News - Breaking news for Sussex (@SussexIncidents) January 1, 2026
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्वित्झर्लंड सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आणि जंगलातील आगींच्या संकटाचा सामना करत आहे, त्यातच ही भीषण दुर्घटना घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर काही ठिकाणी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
घटनेनंतर स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. क्रॅन्स-मॉन्टाना हे पर्यटनाचं मुख्य केंद्र असल्याने तिथे नेहमीच मोठी गर्दी असते. मृतांमध्ये स्थानिक लोकांसोबतच परदेशी पर्यटकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Jan 01, 2026 12:30 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
न्यू इयरचं सेलीब्रेशन अन् रात्री 1.30 वाजता भयंकर बॉम्बस्फोट, जीव वाचवण्यासाठी धडपड, अनेकजण होरपळले










