रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईची लोकल थेट नाशिकला जाणार, गेमचेंजर प्लॅन, काम सुरू
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik News: नाशिक ते मुंबई घाट ओलांडताना लागणारा अतिरिक्त वेळ वाचल्याने प्रवासाचा वेळ किमान 30 ते 45 मिनिटांनी कमी होईल.
नाशिक : नाशिक ते मुंबई हा प्रवास आता मुंबईतील चाकरमान्यांच्या लोकल प्रवासासारखाच वेगवान आणि सुलभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-नाशिक लोकल प्रकल्पाला अखेर रेल्वे मंत्रालयाने गती दिली असून, कसारा ते मनमाड दरम्यानच्या 131 किलोमीटरच्या समांतर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नाशिककरांच्या दळणवळणात क्रांती घडण्याची चिन्हे आहेत.
कसारा घाटाचे 'अग्निदिव्य' होणार सोपे
सध्या कसारा घाटातील तीव्र चढणीमुळे रेल्वे गाड्यांना 'बँकर्स' (जादा इंजिन) लावावे लागतात, ज्यामध्ये बराच वेळ वाया जातो. प्रस्तावित नवीन आराखड्यानुसार:
- घाटात दोन नवीन रेल्वे मार्ग टाकले जातील.
- या मार्गावर तब्बल 18 नवीन बोगदे बांधले जाण्याची शक्यता आहे.
- घाटातील चढाईची उंची कमी केल्यामुळे गाड्या विनाबँकर धावू शकतील, परिणामी मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढेल.
advertisement
प्रकल्पाचे स्वरूप आणि गुंतवणूक
मध्य रेल्वेवरील मुंबई ते भुसावळ हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. या मार्गावरील ताण कमी करण्यासाठी 4,500 कोटी रुपये खर्चून हा 131 किमीचा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. सध्या कल्याण ते कसारा आणि मनमाड ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे. आता केवळ कसारा-मनमाड हा दुवा जोडला गेल्याने संपूर्ण मार्गिका पूर्ण होणार आहे.
advertisement
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनाने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली असून अधिकृत राजपत्र (Gazette) प्रसिद्ध केले आहे. नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.
भूसंपादन होणारी प्रमुख गावे
भगूर, वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवित, संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, देवळाली, पंचक, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव आणि सिद्ध पिंप्री.
फायदे काय होणार?
1. नाशिक-मुंबई लोकल सेवा: स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे भविष्यात थेट नाशिकपर्यंत लोकल चालवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल.
advertisement
2. वेळेची बचत: घाट ओलांडताना लागणारा अतिरिक्त वेळ वाचल्याने प्रवासाचा वेळ किमान 30 ते 45 मिनिटांनी कमी होईल.
3. मालवाहतुकीला गती: अतिरिक्त ट्रॅकमुळे मालगाड्यांची ये-जा सुलभ होऊन उद्योगांना चालना मिळेल.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 12:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईची लोकल थेट नाशिकला जाणार, गेमचेंजर प्लॅन, काम सुरू










