MHADA Home : तयारीला लागा! मुंबईतील पॉश परिसरात म्हाडाची घरं; वाचा A टू Z माहिती

Last Updated:

Mumbai Mhada News : मुंबईत स्वतःचं घर घेणं अनेकांसाठी स्वप्न आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या एमआयजी कॉलनीत लॉटरीद्वारे परवडणारी घरे मिळणार आहेत. ही संधी घेण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवा.

mumbai mhada
mumbai mhada
मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असण्याचं स्वप्न अनेकांच असतं,पण वांद्रे सारख्या पॉश भागात घर घेणं हे बहुतेकांसाठी कठीण असतं. आता मात्र म्हाडा एक सुवर्णसंधी घेऊन येत आहे.
म्हाडाच्या येत्या सोडतीत वांद्रे (पूर्व) येथील एमआयजी कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पातील काही घरांचा समावेश केला जाणार आहे. जेव्हा एखादी वसाहत पुनर्विकासासाठी जाते तेव्हा विकासक आणि म्हाडा यांच्यातील करारानुसार काही तयार घरे म्हाडाला परत मिळतात. ही घरे म्हाडा लॉटरी पद्धतीने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देते.
वांद्र्यात घर मिळणं हे विशेष का असत?
1)कनेक्टिव्हिटी: वांद्रे हे मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण असून, बीकेसी, एअरपोर्ट आणि सी-लिंक मार्ग सहज उपलब्ध आहेत.
advertisement
2)लाइफस्टाइल: उत्तम शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स आणि हँगआउट स्पॉट्स इथे आहेत.
3)किंमत: म्हाडाची घरे खाजगी बिल्डर्सच्या तुलनेत परवडणारी असतात. सध्या ही घरे म्हाडाच्या आगामी सोडतीत समाविष्ट होतील. नेमकी किती घरे आणि कोणत्या उत्पन्न गटासाठी असतील, हे म्हाडा लवकरच जाहीर करेल.
तुम्ही ही संधी मिळवण्यासाठी कोणती तयारी कराल?
1)आपली कागदपत्रे अपडेट ठेवा (डोमिसाईल, उत्पन्न प्रमाणपत्र इ.).
advertisement
2)म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित लक्ष ठेवा.
3)सेव्हिंग्ज आणि होम लोनची पात्रता तपासा. मुंबईत स्वतःचं घर घेण्याची ही मोठी संधी आहे. ही बातमी मित्र आणि नातेवाईकांशी नक्की शेअर करा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Home : तयारीला लागा! मुंबईतील पॉश परिसरात म्हाडाची घरं; वाचा A टू Z माहिती
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement