TRENDING:

15 तारखेपासून पुढचे 5 दिवस धोक्याचे! सूर्य-मंगळाच्या युतीने घडणार भयंकर, 3 राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ

Last Updated:

ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2026 हा महिना ग्रहांच्या दृष्टीने अत्यंत उलथापालथीचा ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यात 'द्विद्वादश योग' निर्माण होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2026 हा महिना ग्रहांच्या दृष्टीने अत्यंत उलथापालथीचा ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यात 'द्विद्वादश योग' निर्माण होत आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या स्थानी असतात, तेव्हा हा योग तयार होतो. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही 'अग्नी तत्त्वा'चे ग्रह असल्याने त्यांच्या या स्थितीमुळे वातावरणात आणि मानवी स्वभावात उष्णता आणि तीव्रता वाढू शकते. विशेषतः 15 मार्च 2026 रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, तर मंगळ आधीच कुंभ राशीत विराजमान आहे. या ग्रहांच्या स्थितीमुळे 3 राशींच्या जातकांनी 20 मार्चपर्यंत अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
News18
News18
advertisement

कन्या - कौटुंबिक कलह आणि तणाव

कन्या राशीच्या जातकांसाठी हा योग सहाव्या आणि सातव्या भावाशी संबंधित असेल. तुमच्या राशीचा स्वामी बुध वक्री असल्याने संवाद साधताना चुकीचे शब्द वापरले जाऊ शकतात. जोडीदाराशी किंवा आई-वडिलांशी विनाकारण वाद होऊ शकतात. घरामध्ये शांतता राखण्यासाठी मौन पाळणे हाच उत्तम उपाय ठरेल. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

advertisement

तूळ - आर्थिक फसवणूक आणि चोरीचे भय

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. सोने-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा, चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध राहा.

advertisement

मीन - आरोग्य आणि मानसिक गोंधळ

15 मार्चला सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करणार असून तिथे आधीच शनी विराजमान आहे. सूर्य-मंगळ द्विद्वादश योगामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. तुम्हाला वारंवार डोकेदुखी, डोळ्यांचे विकार किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. घाईत घेतलेले करिअरविषयक निर्णय अंगलट येऊ शकतात, त्यामुळे कोणताही मोठा बदल तूर्तास टाळावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
15 तारखेपासून पुढचे 5 दिवस धोक्याचे! सूर्य-मंगळाच्या युतीने घडणार भयंकर, 3 राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल