केळीच्या झाडाची पूजा - जया एकादशीच्या दिवशी बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रहाला मजबूत करण्यासाठी केळीच्या झाडाची पूजा करावी. सकाळी स्नान केल्यावर केळीच्या झाडाजवळ जाऊन धूप-दीप लावावा. त्यानंतर हळद आणि गूळ केळीच्या झाडाला अर्पण करावा. असे केल्याने देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो आणि धनधान्याची प्राप्ती होते.
मंत्राचा जप कसा करावा - एकादशीच्या दिवशी 'ॐ बृं बृहस्पतये नमः' या गुरु मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक ठरते. कोणत्याही एकांत स्थळी बसून किमान 108 वेळा या मंत्राचा जप करणं लाभदायी ठरेल. यामुळे मानसिक शांती मिळते आणि कुंडलीतील गुरूचा अशुभ प्रभाव दूर होऊन शुभ फळे मिळू लागतात.
advertisement
पिवळ्या वस्तूंचे दान - जया एकादशीच्या शुभ दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. या दिवशी हळद, हरभरा डाळ, पिवळे वस्त्र, केळी आणि केशर यांचे दान करावे. या दानामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आनंद निर्माण होतो. हा उपाय बृहस्पती देवा सोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवून देतो. जया एकादशीच्या दिवशी कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळा लावणं खूप शुभ ठरेल. केशराचा टिळक लावल्याने बौद्धिक क्षमता वाढते आणि करिअर तसेच व्यवसायात प्रगतीचे योग जुळून येतात. गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी या दिवशी धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे आणि भगवान विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करणे फायदेशीर ठरते.
2026 सालातील भाग्यवान राशीत तुम्ही? या 6 राशींच्या जीवनात येईल प्रगती, यशाची लाट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
