TRENDING:

Black Lizard: घरात काळी पाल दिसत असल्यास सावध रहा! घडू शकणाऱ्या या 7 अशुभ गोष्टींचा संकेत

Last Updated:

Black Lizard Spiritual Meaning: घरात फिकट पांढऱ्या रंगाची पाल सहसा दिसत असते. परंतु जर घरात काळ्या रंगाची पाल दिसली तर सावध झालं पाहिजे. घडणाऱ्या काही अशुभ गोष्टींचा तो संकेत मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घरात पाल दिसणं, पाल चुकचुकणं ही सर्वसाधारण बाब आहे. पाल नाही असं घर सापडणार नाही, दारं-खिडक्या उघड्या असताना कुठून तरी पाल घरात येते, त्यानंतर घरात किंवा आजूबाजूला त्यांची संख्या वाढत जाते. पालीला घाबरणारे अनेकजण आहेत. आजच्या युगातही पालीशी संबधित अनेक समज-गैरसमज आहे. घरात काही तरी बोलत असताना अचानक पाल चुकचुकली की, बोलणारा खरं सांगतोय असं मानलं जातं. आज आपण घरात दिसणाऱ्या दुर्मीळ काळसर रंगाच्या पालीविषयी जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

घरात फिकट पांढऱ्या रंगाची पाल सहसा दिसत असते. परंतु जर घरात काळ्या रंगाची पाल दिसली तर सावध झालं पाहिजे. घडणाऱ्या काही अशुभ गोष्टींचा तो संकेत मानला जातो. काळ्या रंगाला लोक घाबरतात. शकुनशास्त्रामध्ये पाल ऊर्जा, ग्रह आणि नशिबातील बदलांशी संबंधित मानली जाते. घरात काळी पाल दिसण्याचे अशुभ संकेत समजून घेऊ.

काळी पाल दिसणं -

advertisement

१. काळी पाल आणि नकारात्मकता: घरात काळी पाल दिसली तर ती नकारात्मकतेचे लक्षण मानली जाते. घरात काहीतरी बिनसणार असण्याचं ते लक्षण असू शकतं. घरात एकाच ठिकाणी वारंवार काळी पाल दिसणं देखील अशुभ समजलं जातं.

२. काळी पाल आणि अशुभ: घरात काळी पाल दिसली तर सावध व्हायला हवं. जीवनात काही तरी अशुभ घडण्याचा तो संकेत असू शकतो. तुम्ही काही चूक केली असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला मिळणार आहेत, असा त्याचा अर्थ होतो. काळी पाल दिसणं म्हणजे आयुष्यात अचानक बदल होण्याचे संकेत देखील असू शकतात.

advertisement

३. देव्हाऱ्यात काळी पाल: देव्हाऱ्यात काळी पाल दिसणं देव-देवतांच्या नाराजीचे कारण असू शकते किंवा आपण करत असलेल्या पूजेत काहीतरी कमतरता, अशुद्धता असू शकते, असा त्याचा अर्थ होतो.

४. काळ्या पालीचा शनिशी संबंध: काळ्या पालीचा शनिशी संबंध आहे. काळी पाल वारंवार दिसणं म्हणजे शनीचा प्रभाव वाढणार असल्याचे संकेत समजावे.

कमाईचा काळ सुरू! सलग 70 दिवस या राशींचा इनकम वाढणार; बुधामुळे भाग्योदयाचे योग

advertisement

५. बेडरूममध्ये काळी पाल: बेडरूममध्ये काळी पाल दिसणं आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात किंवा वैवाहिक जीवनात भांडण होऊ शकते. जोडीदाराशी दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते.

६. पैशाच्या जवळ किंवा तिजोरीजवळ काळी पाल दिसणं: तिजोरीजवळ किंवा पैशाच्या ठिकाणी काळी पाल दिसली तर ते पैसे गहाळ होण्याची शक्यता दर्शवते. याचा अर्थ तुमचे पैसे कुठेतरी हरवू शकतात किंवा अडकू शकतात.

advertisement

७. स्वयंपाकघरात काळी पाल: स्वयंपाकघरात काळी पाल सतत दिसणं म्हणजे घरात अन्नदोष वाढू शकतात किंवा ते आर्थिक संकटाचे लक्षण असू शकते.

घराचं ब्रह्मस्थान कुठं असतं? तेवढीच जागा रिकामी सोडल्यानं इतके फायदे मिळतात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Black Lizard: घरात काळी पाल दिसत असल्यास सावध रहा! घडू शकणाऱ्या या 7 अशुभ गोष्टींचा संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल