देवघर - कार्तिक पौर्णिमा ही हिंदू धर्मातील खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. यादिवशी भगवान शिव, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुची पूजा आराधना केली जाते. तसेच यादिवशी भगवान शिव, भगवान विष्णु आणि लक्ष्मी मातेची विधीपूर्वक पूजा केल्याने तसेच मंत्रांचा जप केल्याने प्रत्येक समस्या समाप्त होते आणि घरात सुख समृद्धी वाढते, असे मानले जाते. तसेच यादिवशी राशीनुसार काही उपाय केल्याने तुमच्या जीवनात आर्थिक संकटं दूर होतील आणि तुम्ही धनवान व्हाल.
advertisement
ज्योतिषाचार्य काय म्हणाले -
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या वर्षी कार्तिक पौर्णिमा तिथी 15 नोव्हेंबरला आहे. याचदिवशी देव दिवाळी साजरा केली जाते. हिंदू धर्मासाठी ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. राशीनुसार केलेले उपाय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील दोष दूर करू शकतात, असेही ते म्हणाले.
Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे सोपे उपाय, आर्थिक फायदा होणार, सुटतील अनेक समस्या
पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय -
मेष - या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र धारण करुन हनुमानजीची पूजा करावी आणि चोला अर्पण करावा.
वृषभ - या राशीच्या लोकांनी लक्ष्मी मातेची पूजा आराधना करुन कमलाचे फूल अर्पण करावे आणि श्री सूक्ताचे पठण करावे.
मिथुन - या राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र धारण करुन भगवान विष्णु सहस्त्रनामाचे पठण करावे.
कर्क - या राशीच्या लोकांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दुधात मध मिसळून भगवान शंकराचा अभिषेक करावा.
सिंह - या राशीच्या लोकांनी सूर्यला जल अर्घ्य द्यावा.
कन्या - या राशीच्या लोकांनी तुळशीमध्ये दुधात पाणी टाकून अर्पण करावे. तसेच ऊस अर्पण करावा.
तूळ - या राशीच्या लोकांनी लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णुची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा.
वृश्चिक - या राशीच्या लोकांनी भगवान विष्णुची पूजा करावी आणि दीपदान करावे.
धनु - या राशीच्या लोकांनी गायीला पोळी आणि गूळ खाऊ घालावा.
मकर- या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला राम नाम लिहिलेले बेलपत्र अर्पण करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
कुंभ - या राशीच्या लोकांनी दीपदान करावे आणि पिंपळाखाली दिवा लावावा.
मीन - या राशीच्या लोकांनी भगवान विष्णुला पिवळे फूल अर्पण करावे.
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.